• Sat. Sep 21st, 2024

साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात कोणालाही…

साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय; आजपासून मंदिर परिसरात कोणालाही…

Ahmednagar News: शिर्डी येथील साई बाबा संस्थानच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज १२ मे पासून मंदिर परिसरात कोणालाही चप्पल आणि बूट घालून प्रवेश करता येणार नाही.

 

Sai Baba
शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या नगरीमध्ये दररोज देश विदेशातील हजारो साई भक्त साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षारक्षक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल, बूट घालून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये आनंदचं वातावरण आहे.साई बाबा संस्थानच्या वतीने साई मंदिर परिसरात चप्पल बूट घालून प्रवेश करण्यावर बंदीचे नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले असून या नियमाची अंमलबजावणी आज १२ मे पासून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी विना चप्पल बुटाचे मंदिर परिसरात दिसून आले.

यशस्वीचा हा विक्रम कोणाच्याच लक्षात आला नाही; IPLमध्ये प्रथमच असे घडले, पहिल्या ओव्हरमध्ये…
या साईबाबा संस्थानचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा शंकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रशासकिय अधिकारी, अधिक्षक सर्व विभागाचे विभागप्रमुख कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करतांना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश करावा. तसेच संरक्षण विभागाने साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना साईंच्या समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देतांना पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश द्यावा. सदर परिपत्रकाची कार्यवाही दिनांक १२/०५/२०२३ पासून तात्काळ करण्यात यावी असे, नमूद करण्यात आले आहे.

आमच्यासाठी आई-बाबा-गुरु म्हणजेच साईबाबा, भक्ताकडून लाखोंचं सुवर्ण कमळ अर्पण!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed