वर्षभरापूर्वी झाले लग्न
जुनागढमधील या महिलेने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या २३ वर्षीय विवाहितेचे फेब्रुवारी २०२२ मध्ये पोरबंदरमध्ये लग्न झाले होते. आनंदात झालेल्या लग्नसोहळ्यानंतर केवळ दोन आठवड्यांनंतर वधूला कळले की तिच्या पतीला शारीरिक संबंधांमध्ये रस नाही. जेव्हा जेव्हा तिने पतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि पती तिच्यापासून दूर निघून गेला, असे आरोप पत्नीने केला आहे. शरीर संबंधांसाठी त्याने कोणताही उत्साह दाखवला नाही, असे पत्नीचे म्हणणे आहे. पतीने लग्न केले खरे, मात्र आपल्याशी शारीरिक संबंध ठेवून आपल्याला पत्नी होण्याचा अधिकार पतीने दिला नसल्याचे पत्नीने फिर्यादित म्हटले आहे.
तक्रारीनंतर मिळाली धमकी
या नवविवाहित पतीच्या वागणुकीची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता त्यांनी तिला फटकारले आणि यापुढे चर्चा करू नका असे सांगितले, असे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण आपल्या पत्नीने तिच्या पालकांना सांगितले असे पतीला समजल्यानंतर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
चोरीचा आरोप
सासू हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोपही नवविवाहितेने केला आहे. तुझ्या वडिलांनी लग्नात भेट म्हणून रद्दी दिल्याचे असे म्हणत सासू मला टोमणे मारत असल्याचेही नवविवाहितेचे म्हणणे आहे. एकदा सुनेने २०० रुपये चोरल्याचा आरोपही केला तिच्या सासूने केला आणि तिने विरोध केल्यावर पतीने तिला मारहाण केल्याचे नवविवाहितेने तक्रारीत लिहिले आहे. यामुळे ती आता जुनागडमध्ये तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत असल्याचे नवविवाहितेचे म्हणणे आहे.