• Mon. Nov 25th, 2024

    दिवेघाटात भीषण अपघात; वाहनांना धडक देत टँकर थेट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

    दिवेघाटात भीषण अपघात; वाहनांना धडक देत टँकर थेट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

    पुणे : पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे टँकर दरीत कोसळला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबत काहीजण गंभीर जखमी झाले. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.घटनास्थळी पोलीस वाग्निशामक दल दाखल झाले असून अपघातग्रस्त टँकर हा अ‍ॅसिडने भरलेल्या असल्यामुळे अ‍ॅसिडची गळती सुरू झाली आहे. या अपघातग्रस्त टँकरखाली किती जण अडकलेले आहेत याबाबत टँकर उचलल्यानंतर समजू शकणार आहे. हा टँकर सासवड वरून हडपसरच्या दिशेला येत होता. शेवटच्या वळणावर उताराला असताना टँकर वाहनांना धडक देत दरीत कोसळला.

    HDFC बँकेने ग्राहकांना दिला धक्का, आजपासून गृहकर्ज महागले, जाणून घ्या किती वाढला EMI
    याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, सासवडच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर चालला होता. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवत टँकर शेजारी असलेल्या दरीत जाऊन कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच रिस्क्यु टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे.पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दखल झाले आहे.

    मुलाने आईला नातेवाईकासोबत नको त्या स्थितीत पाहिलं, दोघांनी मुलालाच संपवलं, वडिलांनी असा घेतला बदला
    रेक्यू टीमकडून कारवाई करण्याचे काम सुरू असून या अपघातात दोघे जण मृत्यू मुखी पडल्याची माहिती माहिती समोर आली आहे. या घटनेत घटनास्थळी धडक दिलेली वाहने पडलेली असून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दिवे घाटात हा अपघात झाला असून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम सुरू आहे.

    हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा, तलवारही काढली बाहेर
    अचानक झालेल्या घटनेने काही वेळ नागरिकांना काही समजेनासे झाले होते. मात्र टँकर वेगात असल्याने त्याला थांबवणे देखील अवघड होते. मात्र वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो टँकर थेट दरीत कोसळला आहे. रेक्स्यू टीमकडून टँकर काढण्याचे काम सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed