• Mon. Nov 25th, 2024
    मोदींसाठी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक, १.५९ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

    नागपूर : शहरातील मोठा ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि माजी सचिव इक्बाल बेलजी यांना ट्रस्टच्या १ कोटी ५९ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे ताजाबाद ट्रस्टशी संबंधित लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.उमरेड रोडवर असलेल्या प्रसिद्ध ताजाबाद दर्ग्याचे व्यवस्थापन बाबा ताजुद्दीन ट्रस्ट चालवत असल्याची माहिती आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाते. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत काँग्रेस नेते शेख हुसैन हे ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि इक्बाल वेलजी हे त्याचे सचिव होते.

    सराईत चोरट्याने लढवली चोरीची अजब शक्कल, पण करामत फार काळ टिकली नाही, शेवटी व्हायचे तेच झाले
    ट्रस्टचे विद्यमान सचिव ताज अहमद अली अहमद सय्यद यांच्या तक्रारीनुसार तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन आणि सचिव वेलजी यांनी त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करण्यात आली. ट्रस्टला भक्त आणि इतर स्त्रोतांकडून कोट्यवधी रुपये मिळतात, त्यांच्या कार्यकाळात हुसैन यांनी १ कोटी ४८ लाख ३७९ रुपये आणि वेलजी यांनी ११ लाख ५२ हजार २०७ रुपये त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केले.

    दोघांनीही आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी ट्रस्ट कार्यकारी किंवा धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नव्हती. मात्र ट्रस्टचे नवे पदाधिकारी आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. ट्रस्टच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते.

    साताऱ्याची पुनरावृत्ती सोलापुरात; शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले, यावेळचं कारण वेगळं
    ट्रस्टचे विद्यमान सचिव ताज अहमद अली यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही माजी अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्याला ट्रायल कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या दोघांना रविवारी जेएमएफसी कोर्ट क्रमांक- २ मध्ये हजर झाल्याची बातमी आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

    ती प्रियकरासोबत पायरीवर बसून बोलत होती, इतक्यात ३ युवक आले आणि केले धक्कादायक कृत्य
    त्यानंतर डीसीपी अर्चित चांडक यांच्याशी चर्चा केल्यानंतर आर्थिक शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीचे सात दिवसांचे पीसीआर पत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आले. पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १० मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपासात अनेक खुलासे होऊ शकतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *