• Sat. Sep 21st, 2024

मुलगा घरात आला, वडिलांना पाहून किंचाळला; पत्नी आणि आई धावून आली, तोपर्यंत सारं संपलेलं…

मुलगा घरात आला, वडिलांना पाहून किंचाळला; पत्नी आणि आई धावून आली, तोपर्यंत सारं संपलेलं…

जळगाव:शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७ रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहली असून त्यात त्रास देणाऱ्या चौघांची नावं लिहली आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा ओम हा घरात आल्यावर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले, त्याने आरडाओरड केल्यावर उमेश याची पत्नी आणि आईने आरडाओरड ऐकताच धाव घेतली. त्यांनी उमेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेवून उमेशला खाली उतरवलं आणि तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

३०० रुपयांची लाच अन् नोकरी गेली, VIDEO व्हायरल होताच नागपुरातील तो वाहतूक पोलिस निलंबित
‘माझ्या परिवाराला सुध्दा धोका असून म्हणून मी हा निर्णय घेत आहे’

उमेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. मी उमेश ठाकूर पूर्ण शुध्दीत लिहतो की, माझ्या आत्महत्येला सर्वस्व चार लोक जबाबदार आहे, मला वारंवार मानसिक त्रास देवून मला जीवे मारण्याची धमकी देत असतात. किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल आणि त्यांची आई रूखमा रमेश तिरमल यांच्यापासून माझ्या परिवाराला सुध्दा धोका असून मी हा निर्णय घेत आहे. यात माझ्या परिवाराचा काही संबंध नाही. तरी मला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे… मला माफ करा…. अशा चिठ्ठीचा आशय आहे.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत उमेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

११ वर्ष पोटात असह्य वेदना, पेनकिलर्सही आराम देईना, MRI करताच डॉक्टरही हादरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed