• Sat. Sep 21st, 2024
क्रिकेट खेळताना वाद, भांडण टोकाला गेलं आणि अनर्थ घडला; बुलढाण्यात अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला

बुलढाणा : बुलढाण्यात क्रिकेट खेळण्यावरुन एका मुलावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्यावरुन दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. वादातून एकाने दुसऱ्याची बॅट तोडली आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन अल्पवयीन मुलांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून एका मुलाने दुसऱ्या मुलावर चाकूने हल्ला घटना घडली. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगरमध्ये ही प्रकार घडला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत मुलाला बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

क्रिकेटची बॅट तोडल्यावरुन झाला वाद

क्रिकेट हा खेळ मुलांमध्ये गल्लोगल्ली खेळला जातो. पण हाच खेळ एका मुलाच्या जीवावर बेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर येथे राहणारा पीडित अल्पवयीन मुलगा हा आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळत होता. यावेळी दुसरा एक अल्पवयीन मुलगा तेथे आला आणि त्याने त्याची बॅट तोडली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी मुलाने तोडलेल्या बॅटचे पैसे देखील पीडिताला दिले. मात्र दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून आरोपीने पीडित मुलाच्या पोटात चाकूने वार केले. यात उपचारादरम्यान जखमी मुलाचा मृत्यू झाला.

भावावरील हल्ल्याचा बदला; मित्रांसह कोयत्याने वार करून २२ वर्षीय तरुणाची हत्या, नाशिकमध्ये खळबळ
यानंतर जखमी मुलाला तात्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र पोटात घाव मोठा असल्याने त्याला बुलढाण्यात पाठण्यात आलं. त्यानंतर बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच रुग्णालयात दाखल होत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पीडित मुलाच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed