• Sat. Sep 21st, 2024

पतीला दारूचे व्यसन, घरात रोज वाद व्हायचे, चिडलेली पत्नी ३ मुलांना घेऊन गेली अन् घडला एकच थरार

पतीला दारूचे व्यसन, घरात रोज वाद व्हायचे, चिडलेली पत्नी ३ मुलांना घेऊन गेली अन् घडला एकच थरार

धाराशीवःनोकरी गेली या नैराश्यातून बबन बनसोडे यांना दारुचे व्यसन जडले. नंतर दारूची ही सवय रोजचीच झाली. दारूपायी घरात रोज वाद-विवाद व्हायला लागले. पतीच्या या रोजच्या सवयीमुळं पती वैतागली होती. रोजच्या कटकटीला व भांडणाला वैतागून कांचन बनसोडे यांनी टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यांच्या या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बबन बनसोडे यांच्या पत्नी कांचन उर्फ राणी बबन बनसोडे ४० वर्षे, यांनी तीन मुलांसह कोंड येथील तलावात आत्महत्या केली आहे. अनुष्का बबन बनसोडे १४ वर्षे, राजवीर बबन बनसोडे १०, राजनंदिनी बबन बनसोडे ७ महिने अशी मुलांची नावे आहेत. या घटनेने धाराशिव जिल्हा हादरला असून तीन निष्पाप मुलांचा जीव गेल्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे.

निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा
पत्नी कांचन आणि तिचे पती बबन बनसोडे यांचे घरात सतत वाद होते. हे संपूर्ण कुटुंब पुण्यात वास्तव्यास होतं. तिथे ते रोजंदारीचे काम करत होते. मात्र करोनाच्या काळात नोकरी गमावल्याने पतीला नैराश्य आले होते. त्यानंतर ते कोंड येथे स्थायिक झासे. या दरम्यान त्याला दारूचे व्यसन लागले होते. घरी दारू पिऊन आल्यानंतर तो नेहमी कांचन हिला शिवीगाळ करायचा. या रोजच्या कटकटीला वैगातून सोमवारी कांचन या घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्यांना शोधण्याचाही प्रयत्न झाला मात्र त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. अखेर आज कोंड तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले.

अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल

कोंड गावात अवैध दारू विक्री विरुध्द ठराव झाला आहे. तरी सुध्दा या गावात अवैध दारु विक्री सर्रास होते. अवैध दारु विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कोंड ग्रामस्थ व नातलगांनी घेतला आहे. दरम्यान, राणी बनसोडे, अनुष्का बनसोडे, राजवीर बनसोडे, राजनंदिनी बनसोडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची बनसोडे कुटुंबियाने केली आहे. कारण अनुष्का बनसोडेला पोहायला येत होते. असा आरोप राणी बनसोडे यांचे भाऊ प्रविण दतात्रय मैंदाड यांनी केला आहे. प्रवीण यांच्या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबादेत एका एकरात साकारली एकनाथ शिंदेंची भव्यदिव्य प्रतिमा, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलं विहंगम दृश्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed