• Mon. Nov 25th, 2024

    महत्त्वाची बातमी; माणकोलीजवळ पाइपलाइन फुटली, ठाण्यात मंगळवारी या वेळेपर्यंत पाणीपुरवठा बंद

    महत्त्वाची बातमी; माणकोलीजवळ पाइपलाइन फुटली, ठाण्यात मंगळवारी या वेळेपर्यंत पाणीपुरवठा बंद

    ठाणेःउन्हाळा वाढल्याने पाण्याची गरजही अधिकची निर्माण झाली आहे. जलबोगद्यांच्या दुरुस्तीमुळं आधीपासून पाणीकपात करण्यात आली आहे. तसंच, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने मेआधीच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. असं असतानाच ठाणे शहरास पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन माणकोली येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळं शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.ठाणे शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पाच वाजता फुटली. त्यामुळं शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महापालिकेच्या जल विभागातर्फे या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असं मुंबई महापालिकेकडून कळवण्यात आलं आहे.
    १८ वर्षांनंतर खरा ठरला महिलेचा शाप, माफिया अतिकचे संपूर्ण कुटुंबच संपले, काय घडलं होतं नेमकं?
    सोमवारी पाइपलाइन फुटल्यामुळं दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळं सकाळी ९ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहिल. तसंच, बुधवारपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळं यांची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे.

    एन्काउंटर होईल किंवा…; १९ वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती मृत्यूची भविष्यवाणी
    दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले होते. विकासकाच्या चुकीमुळे तब्बल पाच महिने पाण्याची नासाडी झाली. या बांधकाम व्यावसायिकाविरोधात एका तक्रारदाराने ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळं ३१ मार्चपासून एक महिना मुंबई पालिका क्षेत्रातील तसेच ठाण्यातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू आहे.

    ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed