अंबरनाथ: अंबरनाथच्या पालिका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क भर वर्गातच शिक्षिकेने सहकारी शिक्षिकेला मारहाण केली आहे. अंबरनाथ पालिकेच्या कैलास नगर भागातील शाळा क्रमांक १ मध्ये प्रकार घडला असून माझ्या वर्गाला दिलेला पोषण आहार पुरला नाही, जरा जास्तीचा पोषण आहार द्या. अशी मागणी केली म्हणून एका शिक्षिकेने सहकारी शिक्षिकेला लाकडी काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या किरण ब्राह्मणे यांनी पोषण आहार घेऊन आलेल्या व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी माझ्या वर्गाला दिलेला पोषण आहार पुरला नाही. जरा जास्तीचा पोषण आहार देत चला असं सांगितलं मात्र याचा राग विजया घोडे या शिक्षिकेला आल्याने त्यांनी किरण यांच्या वर्गात येऊन भर वर्गातच किरण ब्राह्मणे या शिक्षिकेला शिवगाळ करत लाकडी काठीने मारहाण केली आहे. यामध्ये ब्राह्मणे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
वाघ, पेग्विंग अन् बरंच काही…; फक्त ५० रुपयांत करा राणीच्या बागेची सैर, असं करा ऑनलाइन बुकिंग
दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात शिक्षिका विजया घोडे यांच्या विरोधात कलम ३२४,५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या आधीही दोघी शिक्षिकांमध्ये मस्टरवर सही करण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे दोघींमध्ये एकमेकाबद्दल द्वेष भावना असल्याने हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जाती आहे.नवी मुंबईकरांना उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची संधी?; मेट्रो१ लवकरच धावणार, स्थानके व तिकिट दर जाणून घ्या
याबाबत किरण ब्राह्मणे यांनी सांगितले की, विजया यांनी मला दांडक्याने मारहाण केली आणि माझा गळाही दाबला. त्याचा काही संबंध नसताना वर्गात धावत आल्या आणि मारहाण केली. यात माझ्या हाताला मार लागला आहे. सदर शिक्षिकेविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात मी तक्रार दाखल केली आहे.
साहेबच बनले ड्रायव्हर; सेवानिवृत्त पोलिसाला भावनिक निरोप