कल्पेश गोरडे, ठाणे : तरुणाईमध्ये सेल्फी आणि फोटो सेशन करण्याचा मोह वाढल्याचे अनेक व्हिडिओ किंवा फोटो बऱ्याचदा समोर येत असतात. अशावेळी लहानशी हलगर्जीही एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील कासगाव नदी येथे फोटो सेशन करण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. करण फर्डे असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील कासगांव नदीवरील पावर हाऊस जवळ फर्डेपाडा शिवनेर या गावातील काही तरुण मित्र मंडळी रविवारी संध्याकाळी पोहायला गेले होते. या दरम्यान तरुणांनी फोटो सेशन सुरू केले. या फोटो सेशन दरम्यान एक १८ वर्षीय तरुण हा नदीत खोल वर गेला. मात्र फोटो सेशनच्या नादात तो जास्त खोल पाण्यात गेला.
शरीरसुख नाकारणाऱ्या गर्भवती सुनेची हत्या, नराधम सासऱ्याने चिमुकल्या नातीलाही संपवलं
पोहत असताना त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा १८ वर्षीय तरुण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले. करण फर्डे असे या बुडून मृत्यू झालेल्या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे फर्डेपाडा शिवणेर या गावात शोककळा पसरली आहे.वानराच्या निधनाने गावाला अश्रू अनावर; श्रद्धांजलीसाठी गावात ११ दिवसाचा दुखावटा जाहीर!
सेल्फी आणि फोटो सेशनच्या नादात अनेक दुर्घटना घडल्या असून अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या सेल्फी आणि फोटो सेशन दरम्यान थोडं भान ठेवले पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून केली जात आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई फोटो सेशनच्या आधीन गेली आहे. मात्र तरुणाईने थोडा मोह आवरला तर अशा प्रकारच्या दुर्घटना टळू शकतात. त्यामुळे फोटो सेशनच्या नादात तरुणाईने थोडे भान ठेवले तर अशा घटना नक्कीच टळतील.
नदीपात्रात तरंगणारी बॉडी, हातावर ‘सुभाष’ नाव; ओळख पटवण्यासाठी आलेलं कुटुंब म्हणतं, हे तर…