• Sat. Sep 21st, 2024
भरधाव मिक्सर ट्रकची धडक, कारचा चेंदामेंदा, नागपूर जेलच्या पोलिसाचा अमरावतीत मृत्यू

अमरावती : शहरात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये होणारा मृत्यूदर सुद्धा वाढला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सगळीकडे धामधूम सुरू असताना काल दुपारच्या सुमारास मार्डी ते विद्यापीठ रोडवर टाटा ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यामध्ये एका ४४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ ते मार्डी हा भाग सध्या झपाट्याने विकसित होत आहे. या ठिकाणी मिक्सर रेती व विटांचे ट्रक अनेकदा भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येते. आज विद्यापीठावरील हनुमान महाराज मंदिराजवळ अचानक दुपारच्या सुमारास समोरून येणाऱ्या मिक्सर ट्रकने स्विफ्ट डिझायर गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती ती यात कार चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अंबिका नगर येथील रहिवासी नितीन वामन हजारे हे नागपूर कारागृहात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते सुट्टीवर असताना मार्डीला जात होते. दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव मिक्सर वाहनाने त्यांच्या लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारला समोरासमोर धडक दिली. यात नितीन हजारे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

नदीपात्रात तरंगणारी बॉडी, हातावर ‘सुभाष’ नाव; ओळख पटवण्यासाठी आलेलं कुटुंब म्हणतं, हे तर…
या ठिकाणी बाजूलाच हनुमंताचे मंदिर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ या ठिकाणी होती. अशातच हा अपघात झाल्याने नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांनी तात्काळ पोलीस व संबंधित यंत्रणेला माहिती दिली. या अपघातात मिक्सरचा उजव्या बाजूचा काही भाग अपघातग्रस्त झाला तर लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारचे पूर्ण बोनेट वाकले असून समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे.

शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

अमरावती शहराच्या लगत असलेले अनेक भाग सध्या विकसनशील अवस्थेत आहेत. या ठिकाणी रेती गिट्टी व मिक्सरसारखी जड वाहने शहरातून भरधाव वेगाने जातात. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहरातील एकूणच वाहतूक व्यवस्था विस्कळीत व बेशिस्त झाल्याचे चित्र एकूणच अमरावती शहरात आहे. इतवारा बाजार, इर्विन चौक, पंचवटी चौक, विद्यापीठ चौक, राजापेठ राजकमल या वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा अनियंत्रित व बेशिस्त वाहतूक होत असून त्याचाच फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

चहा घेतला, खोलीत गेला… हळदीच्या दिवशीच डॉक्टरने स्वतःला संपवलं, लग्नघरात शोककळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed