• Sun. Sep 22nd, 2024
शिखर शिंगणापुरातील शंभू महादेव यात्रेत दोघा भाविकांचा हार्ट अटॅकने मृत्यू

सातारा : श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वाहून झाल्यानंतर दोघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यातील एक भाविक बारामती येथील असून, दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटली नाही. तर कावड यात्रेदरम्यान १३ जण पाय घसरुन पडल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर सासवड येथे उपचार सुरू आहेत. विठ्ठल महादेव सागर (वय ४५ वर्ष, रा. शिरवली बारामती) व एका ६५ वर्षीय अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेत १ हजारहून अधिक कावडी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये तेल्या भुत्याची कावड ही मुंगी घाटातून वर चढवण्यात आली. या दरम्यान १३ भाविक दरीत कोसळून जखमी झाले होते. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील चार जखमींवर फलटण येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सासवड येथे उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एक दुःखद घटना घडली. हृदयविकाराचा झटका आलेल्या भाविकाला यात्रेतील गर्दीमुळे वेळेत उपचार मिळाला नाही.

यात्रेत बारामतीतून आलेले विठ्ठल महादेव सागर आणि अनोळखी ज्येष्ठ नागरिकाला बनाजवळ पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. भाविकाला वेळेत उपचार मिळाला नाही. मंदिरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी तब्बल तीन तास लागले. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने या भाविकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या भाविकाचा ग्रामीण रुग्णालयातून इतर रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

नागपूरला जाताना कार मागून ट्रकवर आदळली, दोन महिला डॉक्टरांसह पित्याचा जागीच मृत्यू
जखमींना सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी मदत करून वर काढले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर रविवारी रात्री सागर यांना रुग्णवाहिकेतून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर ज्येष्ठ नागरिकास दहिवडी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते. या दरम्यानच दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पोळ यांनी दिली.

शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

दरम्यान, यात्रेत ९ वर्षीय मुलाला तापातील फिट आली होती. त्याच्यावर दहिवडी येथे रुग्णालयात उपचार केल्यानंतर सध्या खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. त्याचे तब्येत सध्या ठिक आहे. यात्रेत घडलेल्या या घटनांमुळे अवघा परिसर हळहळ व्यक्त होत आहे.

उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed