• Mon. Nov 25th, 2024

    शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव

    शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव

    शिर्डीः आज देशभरात रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतही रामनवमीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. पहाटेपासून दर्शन रांगेत साईभक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. आज दुपारी साईमंदिरासमोर श्रीरामजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.आज रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. पुढचे तीन दिवस हा उत्सव सुरु राहणार आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच भाविकांनी साई दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. आज दिवसभर गर्दी कायम राहणार असल्याने रात्रीपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनने घेतला आहे. मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय सुयोग्‍य होण्‍यासाठी संस्‍थानच्‍या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावरील खर्डी, गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी, घोटी, सिन्‍नर, खोपडी, पांगरी, वावी, पाथरे, दुशिंगवाडी, मलढोन व झगडे फाटा आदी ठिकाणी असलेले पालखी थांबेंच्‍या जागी सुमारे ०१ लाख १७ हजार चौ.फुट कापडी मंडप कनात बिछायतीसह उभारण्‍यात आलेले असून यामध्‍ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्‍यात आलेली आहे.

    शिर्डी आणि रामजन्मोत्सव

    शिर्डीतील रामजन्मोत्सवाची मूळ कल्पना साईबाबांची होती. साईबाबांनीच पुढाकार घेऊन १९११ साली रामनवमी उत्सव सुरु केला. १९११ मध्ये रामनवमीचा पहिला उत्सव शिर्डीत सुरू झाला. यंदा रामनवमी उत्सवाचे ११२वे वर्ष आहे.

    कामाची बातमी! एक्स्प्रेसवेसह जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार, नवे दर जाणून घ्या
    कलेक्टरची परवानगी मिळवली

    साईबाबांचे एक निस्सीम भक्त गोपाळराव गुंड यांनी शिर्डीत दरवर्षी एक यात्रा किंवा उरुस भरवावा अशी कल्पना गावातीलच काही प्रमुखांकडे बोलवून दाखविली. अशा उत्सवासाठी जिल्हा कलेक्टरांची मंजुरी आवश्यक असते. साईबाबा गावकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले व खूप पिच्छा पुरविल्यावर कलेक्टरांनी शिर्डीमध्ये यात्रा भरविण्यास परवानगी दिली.

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; CSMT रेल्वे स्थानकाला जोडणारा हिमालय पूल आजपासून खुला
    शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव कसा पार पडला

    रामजन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी कृष्ण जागेश्वर भीष्म यांचे किर्तन झाले. दुसऱ्या दिवशी गोपालकाला व काल्याचे किर्तन झाल्यावर पाळणा सोडण्याची आज्ञा साईबाबांनी दिली, अशा पद्धतीने रामनवमीचा उत्सव पार पडला. वर्षप्रतिपदेपासून पौणिर्मेपर्यंत उत्सव साजरा होऊ लागला. बघता बघता रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या जत्रेचे स्वरुप प्राप्त होऊ लागले.

    पुणेः बाबांनी कॉलेजबाहेर सोडले पण ते शेवटचेच, ससूनच्या इमारतीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed