• Fri. Nov 29th, 2024
    आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर २१ वर्षांचा, तर प्रेयसी अल्पवयीन होती. दोघांच्या प्रेम प्रकरणाला घरातल्यांचा विरोध असल्यानेच आपलं लग्न होऊ शकणार नाही, ही भीती त्यांना सतावत होती. याच कारणावरुन दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंगराच्या खाली त्यांचे मृतदेह आढळले, तेव्हा ते एकमेकांच्या कुशीत होते.

    कांदिवली पूर्व जानुपाडा परिसरात आकाश जाठे (वय २१ वर्ष) हा वास्तव्यास होता. शेजारील राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अनेक दिवसांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. मात्र त्यांच्या या नात्याला घरातल्यांचा विरोध होता. मुलगी अल्पवयीन आहे, तसेच आपल्या दूरच्या नात्यात आहे, या कारणावरुन घरच्यांनी विरोध दर्शवला होता.

    आकाश जाठेने शाळा अर्धवट सोडली होती. तो स्वच्छता कामगार म्हणून नोकरी करत होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात तो राहत होता. तर अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीत शिकत होती.

    शुक्रवारी पहाटे मुलगी घरी नसल्याचे पाहून घरातले तिचा शोध घेत होते. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. मुलीने तिचा मोबाइल घरीच ठेवला होता. त्यामुळे ती आकाशसोबत असावी असा संशय होता. तो देखील घरात नसल्याचे कळल्याने संशय बळावला.

    मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात, अर्टिगा शिवशाहीवर धडकली, सुप्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू
    आकाश याचे मोबाइल लोकेशन काढले असता. तो पाठाचे पाणी या आदीवासी पाडाजवळ असलेल्या खदानी परिसरात दाखवत असल्याने पोलिसांनी तिथे शोध मोहिम राबवली. त्यावेळी दोघांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. ते दोघे एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत होते.

    सांगलीला निघताना मुंबईत नवऱ्याला लुटलं, बॉयफ्रेण्डसोबत छू व्हायला ९ महिने थांबली, कारण…
    मुलाच्या मोबाइलमध्ये त्याने आईला पाठवलेले मेसेज पोलिसांनी पाहिले. त्यात ‘आम्ही जात आहोत, परत येणार नाही. काळजी घ्या’ असा मेसेज होता. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

    नितेश राणे उद्धव ठाकरेंवर टीका करत होते, तेवढ्यात विधानभवन आदित्य ठाकरेंची एंट्री

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed