मुंबई, दि. २४ : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी काढले.
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त चंद्रकांत थोरात, भूषण पाटील, शैलेश आढाव, दुष्यंत भामरे, शशिकांत केकरे, दयानंद अवशंक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने थ्रो बॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, गोळाफेक, कॅरमसह संगीत खुर्ची आणि अंताक्षरी यासारखे खेळ आयोजित केले होते. या खेळांमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यावेळी गुणवंत पाल्यांचे सत्कार देखील करण्यात आले. राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेने, सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त श्री. काळे यांच्या संकल्पनेतून हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.
०००
अर्चना शंभरकर/विसंअ