• Sun. Sep 13th, 2026

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2023
संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, 15 : संत सेवालाल महाराज यांची  जयंती महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी  आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी  संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  संत सेवालाल महाराजांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर  यांच्यासह  उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

००००

वि.वृ.क्र. 32/ दि.15.02.2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed