• Tue. Nov 26th, 2024

    मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

    ByMH LIVE NEWS

    Feb 2, 2023
    मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

    मुंबई, दि. 2 : बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स 22.50 हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

    सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेफलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. भुमरे म्हणाले की,  एकूण क्षेत्रापैकी ४.५० हेक्टर क्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स व उर्वरित १८.०० हेक्टर क्षेत्रावर सीट्रस इस्टेट इसारवाडी होणार असून४३ कोटी ७९ लाखसात हजार सातशे रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    सीट्रस इस्टेट अंतर्गत क्षेत्रात रंपूर लाइमन्यूसेलरकाटोल गोल्डफुले – मोसंबी ही मातृवृक्ष असणार आहेत.

    या सेंटरची मोसंबी फळ पिकाची जातीवंतरोग व कीडमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करणेमोसंबीच्या दर्जेदार उत्पादन व शास्त्रोक्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक देणे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करणेमोसंबी पिकाच्या व्यवस्थापनफळ प्रक्रियाग्रेंडिंगपॅकेजिंगसाठवणमार्केटिंग व निर्यातीला चालना देणेइंडो – इस्राईल तंत्रज्ञानाने उत्पादकता वाढविणेमृद व पाणी परीक्षणऊती व पाने पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा तसेच निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा देणे ही या सीट्रस इस्टेटची उद्दीष्टे आहेत.

    या सीट्रस इस्टेटमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिकाप्रात्यक्षिकेमातीपाणीऊतीव पाने पृथक्करण प्रयोगशाळानिविष्ठा विक्री केंद्रग्रेडिंगपॅकिंगसाठवण व कोल्ड स्टोरेजऔजारे बँकफलोत्पादन तज्ज्ञवनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञकीटकशास्त्र तज्ज्ञमाती परीक्षण तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्या सेवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधा या सीट्रस इस्टेटमार्फत दिल्या जाणार आहेत.

    तसेचसेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) अंतर्गत इंडो इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये कलम काडीच्या आठ जातीची एकूण 154 झाडे, तर मूलकांडच्या तीन जातीची एकूण 80 झाडे असतील. ४.५० हेक्टरवर असलेल्या या सेंटरचा एकूण खर्च १२ कोटी ८३ लाख ५४ हजार एवढा असणार आहे. निर्यातक्षम फळ बागांची वाढ करणेप्रति हेक्टर ३० टनापर्यंत उत्पादकता वाढविणे, गुणवत्तापूर्वक रोपांची निर्मिती करणेआदर्श रोपवाटिकांची स्थापना करणेकाढणीत्तोर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणेयांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे ही या सेंटरची ध्येय आहेत.

    याशिवाय रोग व्यवस्थापन करणेविविध वाणांची शिफारस करून उत्पादनात वाढ करणेनिर्यातयोग्य वाणांचा विकास करणेपॅकिंगप्रक्रिया यासारख्या काढणीत्तोर व्यवस्थापनावर भर देणेकोल्ड स्टोरेजची उभारणी करून साठवण क्षमता वाढविणेभौतिक व रासायनिक गुणधर्म योग्य असलेली जमिनीची निवडकीड व रोग यांचे एकात्म‍िक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दीष्टे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

    ०००

    राजू धोत्रे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed