• Mon. Nov 25th, 2024

    प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2023
    प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय

    मुंबई, दि. 24 : येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता  घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

    या राष्ट्रीय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात-रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज आढळतात त्यामुळे नागरिक, विद्यार्थी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे अशासकीय संस्था व इतर संघटनांच्या मदतीने राष्ट्रध्वज गोळा करुन तहसील कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत, असे आवाहनही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *