• Mon. Sep 7th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांची उद्या मुलाखत

ByMH LIVE NEWS

Jan 5, 2023
‘दिलखुलास’ कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूजऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दिनांक 6 व शनिवार दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत  प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सध्या सुरु आहेत. या स्पर्धेमुळे क्रीडा विश्वात चैतन्याचे वातावरण आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे स्पर्धेसाठी योगदान, स्पर्धेची तयारी, विविध खेळांचा समावेश, उपलब्ध सुविधा अशा विविध विषयांची उपयुक्त माहिती श्री. दिवसे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed