मुंबई, दि.9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने ‘अंगणवाडी दत्तक धोरण’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौरऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण, या धोरणाची अंमलबजावणी, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालक, निरोगी माता यांना होणारा लाभ, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००