• Fri. Sep 4th, 2026

उद्योग विकास आयुक्त पदी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती

ByMH LIVE NEWS

Oct 3, 2022
उद्योग विकास आयुक्त पदी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती

मुंबई, दि. 3 : विकास आयुक्त, उद्योग तसेच अध्यक्ष मैत्री कक्ष पदाचा कार्यभार आज श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला.

उद्योग संचालनालय, मुंबई कार्यालयात डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून श्री. कुशवाह यांनी कार्यभार स्वीकारला.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या प्राधान्य असलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी उद्योग संचालनालय कार्यरत राहील, असे श्री. कुशवाह यांनी यावेळी सांगितले.

श्री. कुशवाह २००६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. याआधी जिल्हाधिकारी, सांगली, नाशिक, मुंबई उपनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी – म्हाडा, आयुक्त, कौशल्य विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अशा विविध पदांवर कार्यरत राहिले असून एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष, नाविन्यपूर्ण विचारसरणी व प्रशासनाचा गाढा अभ्यासक म्हणून श्री. कुशवाह यांची ओळख आहे.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/3.10.22

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed