म. टा. प्रतिनिधी, पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीतील वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील ताणाला पर्याय म्हणून आता मावळ तालुक्यातील तीन गावांमध्ये सुमारे ११०० एकर जागेवर नवीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी येथील प्रस्तावित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, राज्य सरकारकडून दर निश्चितीला मंजुरी मिळताच भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि महामार्गालगत असलेल्या या भागात नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चाकण एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि विस्तारासाठी जागेची कमतरता यामुळे काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात तळेगाव जवळ पर्यायी औद्योगिक जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
तीन गावांत औद्योगिक क्षेत्र
बऊर येथे सुमारे ८७ हेक्टर, करंज येथे १३५ हेक्टर आणि ब्राह्मणवाडी येथे १८३ हेक्टर इतके क्षेत्र भूसंपादनाच्या प्रक्रियेत येणार आहे. या क्षेत्राचे प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. एमआयडीसीने भूसंपादनासाठी ३२(२) चा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. दरनिश्चितीचाही प्रस्ताव सादर केला आहे.
पाबळमध्येही एमआयडीसी
पाबळ (ता. शिरूर) येथेही सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव आहे. या क्षेत्रासाठी जमिनीची मोजणी लवकरच करण्यात येणार असून, त्यानंतर भूसंपादनासह पुढील प्रक्रियेला वेग येईल.
चाकण औद्योगिक वसाहतीवरील वाढता ताण कमी करण्याबरोबरच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नव्या औद्योगिक पट्ट्याला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, “मावळ तालुक्यातील तीन गावांमध्ये सुमारे ११०० एकर जागेवर एमआयडीसी उभारण्याचे नियोजन आहे त्यासाठी एमआयडीसीने भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. दरनिश्चितीला सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होईल. येत्या दोन-तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे,” असं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा