नागपूर : नागपूरच्या जपानी गार्डन रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या तीन कारपैकी एका इनोव्हा कारचे नियंत्रण सुटल्याने ती थेट जपानी गार्डनच्या भिंतीवर जाऊन आदळली. याचदरम्यान रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कारने चिरडले. या भीषण अपघातात कैलास सनोडिया यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे जपानी गार्डन रोडवर तीन कार भरधाव वेगाने जात होत्या. या तिन्ही कारमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही कार सुसाट वेगाने जात असताना एका इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट नागपूरमधील जपानी गार्डनच्या भिंतीवर जाऊन आदळली. याचवेळी कैलास सनोडिया हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावरून जात होते. नियंत्रण सुटलेली कार त्यांच्या दिशेने गेली आणि त्यांना जोरदार धडक देत चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, सनोडिया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
दरम्यान, अपघाताच्या वेळी इनोव्हा कारसोबत आणखी दोन कार भरधाव वेगाने जात असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यानंतर या दोन्ही कार घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेल्या. त्यामुळे तिन्ही कारमध्ये रेसिंग सुरू होती का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. अपघातग्रस्त इनोव्हा ही टॅक्सी क्रमांकाची कार आहे. धडकेनंतर कारचेही मोठे नुकसान झाले. कारमधील एक व्यक्ती वाहनातच अडकून पडला होता.
दरम्यान, कारमधील चालक किंवा प्रवाशांनी मद्यपान केले असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. तसेच अपघातग्रस्त कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या दोन्ही कारचा शोध पोलिस घेत आहे. जपानी गार्डन रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, त्यामधून या तीन कारची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विशेष म्हणजे, जपानी गार्डन परिसरात पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. अशा वेळी भरधाव वेगाने वाहन चालवणे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. पोलिसांच्या तपासानंतर तिन्ही कारमध्ये रेसिंग सुरू होती का, मद्यपान करून वाहन चालवले होते का आणि अपघातासाठी नेमके कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा