• Sun. Aug 30th, 2026

Samruddhi Mahamarg Robbery: ‘समृद्धी’वर मध्यरात्री पुन्हा लुटीची मालिका, गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी कार अडवून लूटमार, काय घडलं?

Samruddhi Mahamarg Robbery News: खंदारे यांनी मोबाइलमध्ये घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी मोबाइल हिसकावून घेत तो रस्त्यावर आपटून फोडला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: समृद्धी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यात लुटमारीच्या घटनांची मालिका घडल्याचे समोर आले आहे. नांदेडचे कार व्यावसायिक मोहम्मद फरान आणि छत्रपती संभाजीनगरचे ॲड. श्रीकांत मिश्रा यांच्यानंतर गंभीर रुग्णाला मुंबईला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या हिंगोलीतील प्रवाशांची कारही दरोडेखोरांनी अडवली.

रस्त्यावर टणक वस्तू फेकून कार थांबविल्यानंतर चालकासह दोघांना मारहाण करून रोख रकमेसह सोन्याची अंगठी असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रथम त्याला मुंबईला नेले. उपचाराची व्यवस्था केल्यानंतर शनिवारी वावी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.

Maharashtra TimesLasalgaon Onion: कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला; लासलगावात सरकारी कांद्याला दुर्गंधी, साठवणुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्हहिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील पांडुरंग माने हे एर्टिगा कारने अपघातात जखमी झालेल्या अर्जुन खरात यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. कारमध्ये अर्जुन खरात यांची आई बेबीबाई, भाऊ ओंकार आणि चालक मित्र किरण खंदारे होते. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता कार दुसंगवाडी-मलढोण शिवारातून जात असताना दुभाजकाच्या कडेला दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी रस्त्यावर टणक वस्तू फेकली. कार त्या वस्तूवरून जाताच इंजिनचे चेंबर फुटून तेल गळू लागले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला थांबवून माने आणि खंदारे पाहणी करीत असतानाच पाच ते सहा जणांनी त्यांना घेरले. काही क्षणांतच आणखी सात ते आठ दरोडेखोर लोखंडी गज आणि काठ्या घेऊन तेथे आले.

‘गाडीत गंभीर रुग्ण आहे, मारहाण करू नका,’ अशी विनंती करूनही दरोडेखोरांनी दोघांना मारहाण केली. माने यांच्याकडील ३५ हजार ५०० रुपये, खंदारे यांच्याकडील ७ हजार ३०० रुपये आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज हिसकावून घेत दरोडेखोर सायाळे रस्त्याच्या दिशेने पसार झाले. घटनेनंतर पोलिस गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले. याच ठिकाणी काही वेळापूर्वी ॲड. श्रीकांत मिश्रा यांनाही लुटल्याची माहिती पोलिसांनी माने यांना दिली.

Maharashtra TimesNashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?‘समृद्धी’वर सहा दिवस ब्लॉक

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसविण्यासाठी गँट्री (सहा मीटर उंचीची आडवी कमान) उभारणीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ३१ ऑगस्ट ते सात सप्टेंबरदरम्यान सहा दिवस सिन्नर-भरवीर आणि भरवीर-इगतपुरी मार्गावर ठरावीक वेळेत ४५ ते ६० मिनिटे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. सिन्नर-भरवीर मार्गावर तीन दिवस ३१ ऑगस्ट, एक आणि दोन सप्टेंबर रोजी सिन्नर येथील प्रवेशद्वार क्रमांक २१ ते भरवीर येथील प्रवेशद्वार क्रमांक २२ या मार्गावर मुंबई दिशेची वाहतूक दुपारी १२ ते एक आणि नागपूर दिशेची वाहतूक दुपारी तीन ते चार या वेळेत थांबविण्यात येणार आहे. भरवीर-इगतपुरी मार्गावर चार, पाच आणि सात सप्टेंबर रोजी भरवीर येथील प्रवेशद्वार क्रमांक २२ ते इगतपुरी येथील प्रवेशद्वार क्रमांक २३ या मार्गावर मुंबई दिशेसाठी दुपारी १२ ते एक आणि नागपूर दिशेसाठी दुपारी तीन ते चार या वेळेत वाहतूक बंद राहील.

Maharashtra TimesNashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?लूट प्रकरणी अटक
वैजापूर : समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्र. १८, हडसपिंपळगावजवळ राहुरी येथील वाहनचालकाला मारहाण करून दीड लाखाची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत गुन्ह्यातील सर्व संशयितांची ओळख पटवली. पैकी एकास अटक करण्यात आली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा