• Sun. Aug 30th, 2026

Mumbai Chembur Boyfriend Killed Girlfriend : मुंबईच्या चेंबूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. यात चारित्र्याच्या संशयातूनप्रेयसीची हत्या करण्यात आली आहे.

चेंबूर शीतपेयमध्ये विष देऊन गर्लफ्रेंडची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : चारित्र्यावरील संशय आणि त्यामुळे निर्माण झालेला नात्यामध्ये दुरावा यातून एका तरुणाने प्रेयसीला विष देऊन ठार केल्याची घटना चेंबूरच्या माहुल येथून समोर आली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत शवविच्छेदन अहवालातून संशय बळावला आणि त्यानंतर आरोपीला आर. सी. एफ पोलिसांनी अटक केली.

नेमकं काय झालं?

माहुल येथील मैसुर कॉलनी परिसरात घरकाम करणाऱ्यांची एकत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशीष मगर (वय २५), विष्णूमाया (वय १९) तिची काकू भीमा हे सर्व तेथे एकत्र वास्तव्यास होते. २५ ऑगस्ट रोजी रात्री विष्णूमाया हिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांचे पथक म्हैसुर कॉलनीत पोहोचले आणि विष्णूमायाचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात आशीष तसेच इतरांनी दिलेल्या माहितीनुसार काहीच संशयास्पद वाटत नसल्याने पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.

Maharashtra TimesNepal Flood : ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’; नेपाळमधून 37 जणांचा गृप मुंबईत परतला, पोहोचताच कुटुंबीयांना पाहून ढसाढसा रडले, भयावह आपबिती सांगितली

चौकशीचा फास आवळला

शवविच्छेदन अहवालात विष्णूमाया हिच्यावर विषप्रयोगझाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. विष्णूमाया काम करीत असलेले ठिकाण, तिच्या परिचयातील व्यक्ती यांची चौकशी केली असता आशीष आणि तिच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी आशीषभोवती चौकशीचा फास आवळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आशीषला अटक केली.

दुसऱ्या मित्रासोबत दिसली अन् वाद

मिळालेल्या माहितीनुसार, 25 तारखेला विष्णूमाया तिच्या दुसऱ्या मित्रासोबत असताना तिच्यात आणि अशिष मगर यांच्यात वाद झाला होता. वाद थोडा शांत झाल्यानंतर अशिषने तिला शीतपेय प्यायला दिलं. त्यात विष असले याची कोणतीही कल्पना नसणाऱ्या विष्णूमाया ते प्यायली खरी पण ते पिताच तिला त्रास सुरु झाला, अचानक उलट्या होऊ लागल्या. सुरवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्रास वाढला आणि ती चक्कर येऊन पडली तेव्हा मात्र त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तिला आधी खासगी आणि मग शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र तिला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं.

Maharashtra TimesSanjay Raut: सिंहस्थात 25 हजार कोटींची उधळपट्टी, संजय राऊत यांचा मंत्री-अधिकाऱ्यांवर आरोप

प्रेमाचा दुर्दैवी शेवट, घटनेनं चेंबूरमध्ये मोठी खळबळ

दरम्यान, अशिषने आपल्याला शीतपेय दिल्याचं आणि त्यांनंतर आपल्याला त्रास सुरू झाल्याचं तिने सांगितल्यानंतर ही बाब घरच्यांनी पोलिसांना सांगितली. सुरवातीला अशिषने पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. पण पोलीसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर डॉक्टरांनी देखील विषबाधेने तिचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवला आहे. अशिषला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या घटनेनं चेंबूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रेमाचा दुर्दैवी शेवट झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा