मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालक यांच्यासाठीचा मराठी सक्तीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आपल्याला मराठी सक्तीचा निर्णय मान्य नसल्याचं म्हणत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहेत. अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दादागिरी करणाऱ्यांना नांदगावकरांनी मनसे स्टाईलने इशारा दिला.