• Sun. Aug 23rd, 2026

Mumbai Air Hostess Assaulted : स्वतःला तृतीयपंथी असल्याचे भासवत घरात घुसलेल्या तरुणाने एअर होस्टेस महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईत समोर आला असून आरोपी अनिल शिंदे याला अवघ्या चार तासात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आजारी पतीला जादूटोण्याने बरे करण्याचे आमिष दाखवून, स्वतःला तृतीयपंथी असल्याचे भासवत घरात घुसलेल्या तरुणाने एअर होस्टेस महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईत समोर आला आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेविषयी महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अनिल शिंदे (वय २८) याला बुधवारी पहाटे कळव्यातील एका झोपडपट्टी परिसरातून अटक केली.

पवईतील इमारतीपासून ते कळव्याला पोहोचेपर्यंतच्या आरोपीच्या हालचाली १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅक करण्यात आल्या होत्या. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत शिंदेला पकडण्यात आले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घरातून निघण्यापूर्वी अनिलने पीडित एअरहोस्टेस महिलेकडून २०० रुपयेही घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले

अत्याचार आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देण्याशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, पोलीस सध्या कोठडीत असलेल्या अनिल शिंदेवर जादूटोण्याशी संबंधित कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल करणार आहेत.

Maharashtra TimesHyderabad Accident : भरधाव ॲस्टन मार्टिनची धडक, Inorbit मॉलबाहेर 26 वर्षीय तरुणीचा दुःखद अंत, राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा

तृतीयपंथी असल्याचे भासवून भीक मागणारे कुटुंब

“अनिल शिंदेने दावा केला की त्याचे कुटुंब तृतीयपंथी असल्याचे भासवून भीक मागण्याचे काम करते. त्याने यापूर्वीही असा एखादा गुन्हा केला आहे का, याची माहिती आम्ही गोळा करत आहोत” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नजर उतरवण्याच्या बहाण्याने घरात घुसला

ही घटना मंगळवारी दुपारी १२.२० ते १२.५० वाजताच्या दरम्यान घडली. तृतीयपंथीयाचा वेश परिधान केलेल्या अनिल शिंदेने सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन करुन त्या महिलेच्या इमारतीत प्रवेश केला. “अनिलने इमारतीतील प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा ठोठावला; अखेरीस तिसऱ्या मजल्यावरील त्या एअरहोस्टेसने आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. ‘नजर उतरवण्याच्या’ बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला” असे पोलीस उपायुक्त (पश्चिम विभाग-३) दत्ता नलावडे यांनी सांगितले.

पोलिस तक्रारीत महिलेने म्हटले आहे: “रुग्णालयात असलेल्या माझ्या पतीला तो बरा करेल, असे वाटल्याने मी त्या तृतीयपंथी व्यक्तीला माझ्या फ्लॅटमध्ये येऊ दिले. त्याने माझ्या अंगावर थोडे पाणी शिंपडले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला, त्यामुळे मी संमोहित (हिप्नोटाइज) झाले. त्याने माझ्यावर अत्याचार केला आणि मी ओरडल्यावर २०० रुपये घेऊन तो निघून गेला.”

Maharashtra TimesUKG Student Death : गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षिकेने कानशिलात लगावली, सहा वर्षांचा चिमुरडा बाईंच्या मांडीत कायमचा कोसळलात्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास एअरहोस्टेसने पोलिसांशी संपर्क साधला. गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक ए. एस. सावंत, निरीक्षक सुशांत बांदगर, उपनिरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकावर पोलीस उपायुक्त नलावडे यांनी देखरेख ठेवली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा