• Fri. Aug 28th, 2026

Nitesh Rane:महाराष्ट्रातील मच्छीमारांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता ;मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे करणार कर्जमाफीची रूपरेषा तयार

Nitesh Rane:महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यसाय करणाऱ्या व्यवसायिकांसाठी कर्जमाफीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. त्यानुसार नितेश राणे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई :महाराष्ट्रात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी केर्जमुक्ती योजने’ चा लाभ मत्स्यपालन करणाऱ्या शेतकरी आणि मत्स्यव्यवसायिकांना देखील मिळावा असा प्रस्ताव मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडला होता.

कर्जमाफीची रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी नितेश राणेंवर

या नंतर या प्रस्तावाला सकारात्मकतेच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंवर कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे . यामध्ये मच्छीमारांना कर्जमाफी कशी देता येईल याचा आराखडा, किती कर्ज आणि कोणत्या प्रकारचे कर्ज कर्जमाफीच्या कक्षेत आणता येईल या बाबत प्रस्ताव ,संबंधित विभाग आणि सरकारसमोर प्रस्ताव मांडणे अशा जबाबदाऱ्या नितेश राणेंवर सोपवण्यात आल्या.

८०.८७ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता

राज्यात १९ हजार मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मत्स्य व्यवसायिकांना सुमारे८०.८७ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. यामध्ये ९,००० मच्छीमारांनी किसान क्रेडिट कार्ड मधून कर्ज घेतल होत. किसान क्रेडिट कार्ड वर पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. हा निर्णय ९ मे २०२५ रोजी घेण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्यव्यवसायिकांना कर्ज ,याोजना यांचा लाभ घेता यावा सवलती मिळाव्या हा उद्देश होता. त्यानुसार कमी व्याजदरात कर्ज , सरकारी कृषी योजनांचा लाभ ,मत्स्यपालनासाठी अनुदान व आर्थिक मदत , वीज ,पाणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सवलती मिळून मत्स्यव्यवसायाला अधिक महत्त्व आणि मच्छिमारांचे उत्पन्न् वाढण्यास मदत होऊ शकते.

Maharashtra TimesNashik Crime : 43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट

कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर महत्त्वपूर्ण बदल

मत्स्यव्यवसाय ाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर महत्त्वपूर्ण बदल मत्स्यव्यवसायामध्ये आढळून आले. नागपूर येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालय परिसरात विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व सुविधा केंद्र उभारण्याचे काम मे २०२६पासून सुरू झाले आहे . त्यामुळे नागपूर विभागासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याऐवजी उपलब्ध सुविधांचा वापर करून गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Maharashtra TimesTrimbak News: त्र्यंबकला संशयकल्लोळ; रुग्णालयाला आरक्षित जागा तरी देखील खाजगी जागांच्या ठरावाची मागणी

मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेचाही विचार

पावसाळ्यात अनेक ठिकाणी मासेमारीवर बंदी असलेल्या कलावधीत मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेचाही विचार राज्य सरकार करत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ही मदत देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार राज्यातील ८,८२९ मच्छीमार कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे १७ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये निधीची आवश्यकता आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा