राज्य सरकारने एका गटशिक्षणाधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यावर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच एका मुख्याध्यापिकेला देखील निलंबित करण्यात आलं आहे.
प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथील गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत नईमोद्दीन यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम न राबविणे, पीएमश्री शाळा चिकलठाण येथील निधी अखर्चित राहणे, गणवेश योजनेची कार्यवाही पूर्ण न करणे, असा कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
याबाबत शासनाच्या आदेशात म्हटले आहे, गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केली. शिक्षण विभाग नियंत्रित करीत असलेल्या यंत्रणा व मनुष्यबळावर प्रभावी नियंत्रण ठेवून ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना, माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम न राबविणे, कन्नड तालुक्यातील पीएमश्री शाळा चिकलठाणचा निधी अखर्चित राहणे, गणवेश वितरणाबाबत बैठकीत, दूरध्वनीद्वारे सूचना देऊनही गणवेश विहित वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले किंवा नाही याची खातरजमा न करणे, शैक्षणिक व प्रशासकीय बाबींकडे दुर्लक्ष करणे आदी अनुषंगाने शिक्षण आयुक्तांनी निलंबनाची शिफारस केली.
MLA Disqualification : आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, वाचा A टू Z युक्तिवाद कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम तीनचा भंग केल्याचे दिसून येत असल्याने शासनाने शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे निश्चित केले. त्यानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम चार(१) (अ) अन्वये आदेशाच्या दिनांकापासून त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. पुढील आदेश होईपर्यंत त्या निलंबितच राहतील.
हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती कन्नड हे राहील, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. यासह निलंबित असताना खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे त्यांना अनुज्ञेय असणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.
Rajendra Singh Rana Case : ठाकरेंच्या वकिलांचा शेवटचा डाव, राणा प्रकरण ठरणार गेमचेंजर? शिंदे अडचणीत, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या A टू Z
मुख्याध्यापिकाही निलंबित
कन्नड तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिकलठाण येथील मुख्याध्यापिका सुनीता सांडू लहाने यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की कामकाजात अनियमितता करणे, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेस प्राप्त निधी खर्च न करणे, पालकांच्या तक्रारी असणे, शाळेचे अभिलेखे घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही उपस्थित न राहणे व वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे पालन न करणे आदी गंभीर बाबी चौकशी अहवालात निदर्शनास आल्या होत्या.निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सिल्लोड येथे निश्चित करण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा