Nagpur Wife kills Husband : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. सुधीर महेंद्रप्रसाद द्विवेदी (वय ३३, रा. गजानननगर, हिंगणा रोड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिषकुमार नरेशकुमार अग्निहोत्री (वय २९, रा. आनंद बुद्ध विहारजवळ, गजानननगर) याला अटक केली आहे.
पूजा सुधीर द्विवेदी (वय २२) ही फरार आहे. आशिषकुमार आणि सुधीर एमआयडीसीतील कंपनीत कामाला होते. ओळखीतून आशिषचे सुधीरच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. याच काळात आशिष आणि पूजा यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सुधीर अडसर ठरत असल्याने पूजा आणि आशिषने त्याच्या हत्येचा कट आखला.
Mumbai News : बेस्ट बसच्या धडकेत हेमंत जोशींचा अंत, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे BMC ला आदेश
दारु पाजून गळा आवळला
९ ऑगस्टला रात्री आशिष आणि सुधीर यांनी दारू प्यायली. त्यानंतर पूजा आणि आशिषने ओढणीने सुधीरचा गळा आवळून खून केला. बॉडी राजीवनगर भागात फेकून बाजूला दारूची बाटली ठेवण्यात आली. सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला. आशिषला अटक करून चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
क्षुल्लक वादातून हत्या
दुसरीकडे, सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगिरी झोपडपट्टी परिसरातील पुलाजवळ चंदन हरिचंद सिरसवार (वय ४३, रा. गवळीपुरा, धरमपेठ) याची हत्या करण्यात आली. चंदन याचा दुधाचा व्यवसाय होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंदन पुलाजवळील पानठेल्याजवळ बसला होता. यावेळी सागर सुरेश भोंडेकर (वय २७, रा. विकासनगर) हा ई-रिक्षा घेऊन आला. त्याच्या रिक्षाची बिसन राऊत यांच्या चहा-नाश्त्याच्या ठेल्याला धडक बसली. त्यामुळे ठेल्याचे तिरपाल फाटले. यावरून चंदनने सागरला शिवीगाळ केली. सागर संतापून घरी गेला आणि काही वेळाने ऋषिकेश राजेंद्र कनोजिया (वय १९, रा. रामगिरी झोपडपट्टी), राहुल ऊर्फ झिंग्या मनोहर सलामे (वय १९) आणि एका अल्पवयीन मुलासह परतला.
Mumbai Crime : तुला जायचं तर जा, मुलांना कुठेही न्यायचं नाही; मुंबईतील नौदल जवानाच्या कुटुंबाच्या मृत्यूमागे वैवाहिक वाद? दोन महिन्यांच्या बाळालाही संपवलंवाद वाढताच सागर आणि त्याच्या साथीदारांनी चंदनला मारहाण केली. एकाने गट्टूने त्याच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी चंदनला मेयो रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ऋषिकेश आणि राहुलला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सागरचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सागरवर अमली पदार्थ तस्करीचे आरोप आहेत.
गणेशपेठेत भावाची हत्या
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भावाने साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून भावाची हत्या केली. या हल्ल्यात मृताचे दोन मित्र जखमी झाले. अक्षय प्रकाश शेट्टे (वय २८, रा. अत्तरओळ) असे मृताचे नाव आहे. अंकित जितेंद्रसिंग चव्हाण (वय २७, रा. झेंडा चौक, महाल) आणि आकाश केशव पटले (वय २८, रा. जयकमल कॉम्प्लेक्स) जखमी झाले आहेत. मयूर प्रकाश शेट्टे (वय ३३), रितेश ऊर्फ सोनू प्रल्हाद डेंगे (रा. गाडीखाना), अमोल ऊर्फ भुऱ्या सुरेश खुरसोड (रा. नंदनवन) आणि अर्पित ईश्वर बुधे (रा. कर्नलबाग) अशी आरोपींची नावे आहेत.
ChatGPT finds Lost Clog : हजारो चपलांच्या गर्दीत शूज हरवले, शुभांग बोरकरची भन्नाट डोकॅलिटी, ChatGPT ची मदत, काही मिनिटात जोडे शोधलेमयूरला दारूचे व्यसन असून तो आजीला मारहाण करीत असल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्रीही त्याने आजीला मारहाण केल्याने अक्षय संतापला. अक्षय, आकाश आणि अंकित हे तिघे मोटारसायकलने मयूरचा शोध घेत होते. अशोक चौक मार्गावरील मोरघडे क्लिनिकसमोर मयूर आणि त्याचे साथीदार दिसले. अक्षयने जाब विचारताच वाद वाढला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी अक्षय आणि अंकितवर शस्त्राने वार केले, तर आकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
