• Mon. Aug 10th, 2026

    Crime News: सुनेपेक्षा मुलीला जास्त महत्त्व देतेय; पोटच्या लेकाने ६५ वर्षीय आईला संपवलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना उघड

    अमुलकुमार जैन, नवी मुंबई: आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलाने आईचे डोके फरशीवर आपटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नंदा रळकर कदम (६५) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा महेश रळकर कदम (४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी आपल्या आईच्या वागण्यावरून नाराज होता. आई पत्नीला योग्य महत्त्व देत नसल्याचा आणि मुलीचीच बाजू घेत असल्याचा त्याचा आरोप होता. याच कारणातून त्याच्या मनात आईबद्दल राग निर्माण झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

    वाद वाढला अन् संतापाचा उद्रेक

    ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ ते रात्री पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान घरात वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात आरोपीने आईवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्याने आईचा श्वास रोखला. त्यानंतर तिचे डोके फरशीवर आपटल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वाशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी महेश कदम याला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अटक केली.

    दरम्यान, कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या या घटनेने परिसर हादरला असून, ज्या आईने मुलाला जन्म देऊन वाढविले, त्याच मुलावर तिच्या हत्येचा आरोप झाल्याने वाशी परिसरात खळबळ उडाली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed