Mumbai News: योग्य सल्ल्ला आणि मार्गदर्शनाशिवाय मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आसामच्या १५ वर्षाच्या रूपल (बदललेले नाव) हिला चित्रपटाबद्दल फार आकर्षण होते. आपणही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून मोठी अभिनेत्री व्हावे असे तिचे स्वप्न होते. अभिनेत्री होण्यासाठी तिची काहीही करण्याची तयारी होती. त्यातच मुंबईतील फिल्मसिटीबाबत तिने बरेच ऐकले होते. अनेक बडे अभिनेते आणि अभिनेत्री याच फिल्मसिटीतून तयार झाल्याचे तिने वाचले होते. त्यामुळे तिलाही राहवले नाही आणि रूपल देखील घरच्यांना काहीच कल्पना न देता घरातून बाहेर पडली.
Prabalgad : प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खालीरूपलने मुंबई गाठली आणि मुंबईत आल्यावर थेट आरे फिल्मसिटी येथे पोहोचली. आतमध्ये प्रवेश न देण्यात आल्याने बाहेर घुटमळत असताना आरे पोलिसांची नजर तिच्यावर पडली. पोलिसांनी अल्पवयीन असलेल्या रूपलला ताब्यात घेऊन तिच्याविषयी, कुटुंबीयांविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या मोबाइल क्रमांक मिळताच पोलिसांनी पालकांशी संपर्क केला. रूपल हिला आसाममध्ये शोधत असताना तिच्या पालकांना मुंबई पोलिसांचा फोन गेला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.
आरे पोलिसांना उत्तर नियंत्रण कक्षातून एक संदेश आला. फिल्म सिटी येथे एक बेवारस मुलगा फिरत आहे, असे सांगण्यात आले. आरे पोलिसांचे पथक तत्काळ फिल्मसीटीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले आणि आपुलकीने त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी पारस नाव सांगणारा हा १६ वर्षांचा मुलगा मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील एका गावातून आल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने पारस यास ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात नेले. घाबरलेल्या पारस याला धीर देत त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका खूप आवडते आणि त्या मालिकेत काम करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास छिंदवाडा रेल्वे स्टेशन येथून सुपरफास्ट ट्रेन पकडून नागपूर येथे आणि तेथून दुसरी ट्रेन पकडून ७ ऑगस्ट रोजी तो मुंबईत आला. गोरेगाव स्थानकावर उतरून पारस याने चालत चित्रनगरी गाठली.
Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर? न्यायमूर्तीच्या संभाव्य बदलीमुळे नवे पूर्णपीठ स्थापन करावे लागण्याची शक्यतापारसने सांगितलेली कथा ऐकल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला. वडिलांना फोन करून हटकल्यावर त्यांनी, पारस शाळेत जातो सांगून घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. आम्हीच त्याला शोधत असून इकडच्या पोलिस ठाण्यातही तक्रार करण्याच्या तयारीत होतो. आम्ही पारस याला घेण्यासाठी मुंबईत येत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यानुसार आरे पोलिसांनी पारस याला सुरक्षित ठेवले.
मुलांकडे लक्ष ठेवा
मायानगरीचे ग्लॅमर ग्रामीण आणि इतर राज्यातील अल्पवयीन मुलांना भुरळ पाडते. अनेकदा मुले परिणामांचा विचार न करता घर सोडून निघून येतात. नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
