• Mon. Aug 10th, 2026

    Bandra Football Ground: क्रीडांगण वाद न्यायालयात; वांद्रे येथील फुटबॉल मैदानाच्या आरक्षण बदलास विरोध

    मुंबई : वांद्रे रिक्लेमेशन येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे रूपांतर प्रदर्शन केंद्र व परिषद सभागृहात करण्याच्या मुंबई महापालिका व म्हाडाच्या हालचाली सुरू असताना, आता त्याचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. कारण मुंबई फुटबॉल असोसिएशनने म्हाडाच्या ३ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्राला आणि महापालिकेच्या सुधार समितीच्या मे महिन्यातील शिफारशीला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याविषयी आज, सोमवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    महापालिकेच्या सुधार समितीने मुंबईचा सुधारित विकास आराखडा-२०३४अंतर्गत या भूखंडाचे आरक्षण बदलण्याबाबत शिफारस केली आहे. मात्र, ‘ही शिफारस व महापालिकेचा निर्णय बेकायदा व मनमानी स्वरूपाचा असून मुंबईतील प्रमुख फुटबॉल मैदानांपैकी एका मैदानाला धोका निर्माण करणारा आहे’, असे संघटनेने याचिकेत म्हटले आहे.

    Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर? न्यायमूर्तीच्या संभाव्य बदलीमुळे नवे पूर्णपीठ स्थापन करावे लागण्याची शक्यता‘म्हाडाने वेळोवेळी नूतनीकृत केलेल्या परवानग्यांच्या आधारे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून आम्ही या मैदानाची देखभाल व व्यवस्थापन करत आहोत आणि याठिकाणी संघटित फुटबॉलचे उपक्रमही सुरू ठेवले आहेत. तसा वापर सुरू ठेवण्याची परवानगी मागण्यासाठी ३१ जुलै २०२५ रोजी अर्जही केला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय आरक्षण बदलण्याची शिफारस करण्यापूर्वी आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही किंवा आम्हाला बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही’, असा दावा संघटनेने केला आहे.

    तसेच ‘मंजूर विकास आराखडा २०३४मध्ये हे मैदान क्रीडांगण व मोकळी जागा म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७ अन्वये कायदेशीर प्रक्रिया केल्याविना आरक्षण बदलणे बेकायदा आहे’, असा युक्तिवाद संघटनेने याचिकेत मांडला आहे.

    ‘परिसरात परिषद केंद्र नसल्याचा दावा चुकीचा’

    ‘मैदानाचे आरक्षण बदलण्यामागे परिसरात कोणतेही प्रदर्शन व परिषद केंद्र नसल्याचे कारण प्रशासने पुढे करत आहेत. मात्र, ते वस्तुस्थितीला धरून नाही. या परिसरात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियम आणि एमएमआरडीए एक्झिबिशन ग्राउंड्स यासारख्या सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत’, असेही संघटनेने निदर्शनास आणले आहे.

    Gunratna Sadavarte: सदावर्तेंची मनोज जरांगेंविरोधात ‘जरांगे झोडपो’ पत्रकार परिषद

    मुलांच्या खेळावर विपरित परिणाम

    महापालिकेने हा प्रस्ताव मंजूर केला आणि मैदानावरील क्रीडा सुविधा कायमस्वरूपी नष्ट केल्या तर मोठे नुकसान होईल. हा प्रस्ताव १० ऑगस्ट रोजीच्या महापालिकेच्या सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मैदानाच्या स्वरूपात बदल करणारी कोणतीही कृती करण्यास तातडीने मनाई करावी’, अशी विनंतीही संघटनेने याचिकेत केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed