• Mon. Aug 10th, 2026

    Nitin Gadkari: खोदकामावर गडकरींचा अल्टिमेटम! नागनदी कामांवरुन इशारा; अधिकाऱ्यांचे निलंबन, तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अमृत योजनेसह विविध प्रकल्पांच्या नावाखाली रस्ते खोदून ते पूर्ववत न करणाऱ्या यंत्रणांना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट इशारा दिला आहे. नागनदी प्रकल्पाच्या कामात रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा आणि संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, असे स्पष्ट आदेश गडकरी यांनी रविवारी प्रशासनाला दिले. त्यामुळे नागनदी प्रकल्पाच्या कामात रस्ते खोदणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित होणार आहे.

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, संजय भेंडे, सत्तापक्षनेते बाल्या बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर, नासुप्र सभापती संजय मिणा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Crime News: महिलेला पुण्यातील कंपनीकडून परदेशात नोकरीची ऑफर, पण तिथं पोहोचताच धक्कादायक प्रकार; पळून माघारी येताच सांगितली आपबीतीरस्ता खोदकामापासून पुनर्स्थापनेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी निश्चित करण्याच्या गडकरींच्या आदेशामुळे नागनदी प्रकल्पाच्या कामात ‘खोदून सोडून देण्याची’ पद्धत थांबवण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करते, याची उत्सुकता आहे.

    नागनदी प्रकल्पात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि मलवाहिन्यांची कामे होणार असून, पाच टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी शहरातील पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व विधानसभा मतदारसंघांतील विविध रस्त्यांचे खोदकाम होणार आहे.अमृत योजनेतील कामांदरम्यान रस्ते खोदल्यानंतर अनेक ठिकाणी ते पूर्ववत न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हा अनुभव लक्षात घेऊन नागनदी प्रकल्पात खोदकाम आणि रस्ते पुनर्स्थापना या दोन्ही कामांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.

    अमृतसह अन्य योजनांची कामे करताना सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर का करण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. युटिलिटी मॅपिंग तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

    रस्ते खोदताना पाणी, गॅस, वीज, दूरसंचार आदी विविध युटिलिटींच्या पाइपलाइन आणि केबल्सचे नुकसान होऊ नये, यासाठी युटिलिटी मॅपिंगची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा मुद्दा गडकरी यांनी उपस्थित केला.सध्या रस्त्याखालील युटिलिटींचे मॅपिंग उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर गडकरींनी पुढील शंभर वर्षांचा विचार करून रस्त्यांच्या खाली सर्व प्रकारच्या पाइपलाइनसाठी ‘कॉमन डक्ट’ उभारण्याची सूचना केली.

    Maharashtra TimesNagpur Crime : दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलंनागनदीचे प्रदूषण रोखा

    नागनदीतील प्रदूषित पाण्याचा परिणाम नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांसह भंडारा जिल्ह्यातील भागांवर होत असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि शेतीला स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा, ‘माफी मागा अन्यथा कोर्टात खेचू’!२५०० कुटुंबांचे पुनर्वसन

    नागनदीच्या काठापासून १५ मीटरच्या आत असलेल्या अनधिकृत वसाहती आणि झोपडपट्ट्यांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे २५०० घरांच्या पुनर्वसनाची आवश्यकता असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.त्यावर मनपा आणि नासुप्रच्या रिकाम्या जागांचे सर्वेक्षण करून तब्बल ५००० घरांची सोय करता येईल, अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. पुनर्वसन करताना प्रकल्पबाधित आणि अतिक्रमणधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रहिवासी दाखल्यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed