• Fri. Aug 7th, 2026
    सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा

    Nagpur Senior Officer Daughter assaulted : २० वर्षीय आरोपी तरुण विमानाने ठाण्याहून नागपुरात आला. खोली भाड्याने घेतली. तिथे धमकावून मुलीला भेटायला बोलावलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला. तिथेही त्याची हौस फिटली नसून लॉकअपमध्ये मऊसूद बिछाना मागत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी बोलावलं, त्यानंतर तिला तब्बल ३० तास डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या काळात आरोपी निर्भय ऊर्फ आकाश माधव पाखरे (२०, रा. घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, पाटीलपाडा, ठाणे) याने मुलीचे हातपाय बांधून तिच्या शरीरावर चाकूने २० वार केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

    पूर्वनियोजित हल्ला

    पीडिता ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे. नागपूरच्या दिघोरी भागातील एका भाड्याच्या फ्लॅटमधून तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी सांगितले की त्यांना या नियोजित हल्ल्याचे पुरावे सापडले आहेत. मुलीला तिथे २४ तासांहून अधिक काळ ओलीस ठेवण्यात आले होते. सोमवारी उशिरा पोलिसांनी तिथे धाड टाकण्यापूर्वी तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले, त्याचे चित्रीकरण केले गेले, तसेच तिला चाबकाने मारहाण करुन चाकूने वारही करण्यात आले.

    पिझ्झा, बेडची मागणी

    आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. स्वतःच्या मोबाईल फोनचे तसेच पीडितेच्या फोनचे पासवर्ड सांगण्यासही नकार दिला. त्याने लॉकअपमधील परिस्थितीबद्दल तक्रार केली असून, नाश्त्यासाठी पिझ्झा, उत्तम दर्जाचे जेवण, मऊसूद बिछाना आणि डास प्रतिबंधक क्रीमची मागणी केली आहे, तर दुसरीकडे त्याने काळवंडलेल्या भिंती आणि अस्वच्छ शौचालयांवरही आक्षेप घेतला आहे.

    Maharashtra TimesMumbai Crime : मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट

    गुप्तांगावर खोल जखमा

    नागपूर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या शरीर, मनगट आणि गुप्तांगांवर किमान २० खोल जखमा, चावा घेतल्याच्या खुणा आणि चाबकाच्या फटक्यांमुळे झालेल्या जखमा आढळून आल्या. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ती तीव्र मानसिक आघातातून जात आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही मुलगी आरोपी निर्भय ऊर्फ आकाशच्या संपर्कात आली होती. आरोपीने स्वतःचे नाव आकाश मेहरा असल्याचे सांगून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला धमकावून आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवायला भाग पाडल्याचा आरोप आहे.

    विमानाने नागपूरला

    रविवारी आरोपी विमानाने नागपुरात आला. त्याने दिघोरीत खोली भाड्याने घेतली. सकाळी त्याने मुलीला तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत भेटायला येण्यास भाग पाडले. दुपारी आरोपी तिला भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. तेथे तिचे हातपाय बांधले. तोंडाला रुमाल बांधला आणि चाकूने वार केले.

    Maharashtra TimesCrime News : सात महिन्यांचा संसार, पतीचं टोकाचं पाऊल, घाबरुन पत्नीनेही मृत्यूला कवटाळलं, पण शेवटी मोठा ट्विस्टरविवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी नातेवाइकांच्या संपर्कात होती. तिचा मोबाइल बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. वडिलांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चौकशीत ती आकाश नावाच्या युवकाच्या संपर्कात असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी आरोपीने लँडलाइनवरून धमकी दिल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या आईशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीच्या दुसऱ्या मोबाइलचा धागा पोलिसांना मिळाला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा