• Thu. Aug 6th, 2026

    Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात 55 वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, जनकापूरमधील घटना, चालू वर्षात 28 बळी

    Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात 55 वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, जनकापूरमधील घटना, चालू वर्षात 28 बळी

    Chandrapur Tiger Attack: या घटनेच्या निमित्ताने मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

    जनकापूर येथील रमेश काशीवार (५५) हे दुपारच्या सुमारास जंगलालगतच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. याच सुमारास वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यात त्यांचा मृतदेह आढळला. यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

    Maharashtra TimesPune Police: सिंघमगिरी पुणे पोलिसांच्या अंगलट! तीन आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवणाऱ्या PI ची बदली, पोलीस महासंचालकांना नोटीसघटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. या घटनेमुळे जनकापूर व परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगतच्या शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिकांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

    चालू वर्षात २८ बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात वाघाच्या हल्ल्यात २६, तर हत्ती व बिबट्याच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी; २०२५मध्ये वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये ४७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यापैकी वाघांच्या हल्ल्यांत ४२, बिबट्यांच्या हल्ल्यात तीन तर अस्वल आणि हत्तीच्या हल्ल्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता.

    Maharashtra TimesArchana Patil : 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटलांनी आधी WhatsApp स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरीवाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत

    राज्यातील वाघांच्या मृत्यूबाबत वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडेवारीत तफावत आढळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनटीसीएला आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तीन वाघांच्या मृत्यूच्या घटनांवर न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालय मित्र अॅड. चैतन्य ध्रुव यांनी वनविभागाने सादर केलेली आकडेवारी आणि एनटीसीएच्या संकेतस्थळावरील आकडे जुळत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. २०२१ ते २०२५ या कालावधीत एनटीसीएच्या केंद्रीकृत डेटाबेसमध्ये नोंद असलेल्या १६ वाघांच्या मृत्यूंचा अधिकृत आकडेवारीत समावेश नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर न्यायालयाने एनटीसीएला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा