• Thu. Aug 6th, 2026
    Ravindra Dhangekar : महायुतीत पुन्हा जुंपली? ‘एकनाथ शिंदेंमुळे भाजप सत्तेत’; विजय चौधरींच्या कथित ऑडिओ क्लिपने रविंद्र धंगेकर संतापले

    Ravindra Dhangekar on BJP Vijay Chaudhary Audio Clips : शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच भाजप सत्तेत असल्याचा दावा करत भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात बोलणं थांबवावं’, अशी मागणी त्यांनी केली.

    रवींद्र धंगेकर ट्वीट
    अभिजित दराडे, पुणे : सध्या राज्यभरात भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्सने धुमाकूळ घातला आहे. विजय चौधरी यांनी अनेक बड्या नेत्यांसंदर्भात धक्कादायक दावे आणि गौप्यस्फोट या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये केले असल्याचा दावा केला जात आहे. आत्तापर्यंत यामध्ये भाजप नेत्यांसंदर्भात वक्तव्य असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता भाजप आमदार अमरीश पटेल आणि विजय चौधरी यांची एक नवीन कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याविषयी चर्चा झालेली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख करत ‘हा लाडकी बहिणीमुळे निवडून आलाय, नाहीतर पडला असता’ असा संवाद या दोन नेत्यांमध्ये झाला आहे. तर सामंतांना गुंड सुद्धा म्हटलं गेलं आहे.

    ‘तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारा, अन्यथा…’

    यावरून कथित ऑडिओ संभाषणावरून आता महायुतीत तणाव वाढला आहे. उदय सामंत यांनी ही ऑडिओ क्लिप खरी आहे का? यासाठी पोलिसांत अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि पुणे शहर महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच आवाहन केलं असून ‘तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारा, अन्यथा मी चंद्रकांत पाटील यांचे रोज नवे कारनामे बाहेर काढेल’, असा थेट इशारा वजा धमकीच दिली आहे. त्यामुळे विजय चौधरी यांच्यामुळे आधीच अडचणीत आलेली भाजपा आता थेट महायुतीत मित्र पक्षाच्या सुद्धा टार्गेटवर आली आहे.

    रवींद्र धंगेकर या कथित ऑडिओ क्लिप बद्दल म्हणाले, ‘आज जी भाजप सत्तेत आहे ती सगळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कृपा आहे. आज जर राज्यातील लोकप्रिय आमदारांची लिस्ट केली तर उदय सामंत साहेब व शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्ये थांबवावी. आमचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मी जाहीर निषेध करतो. अशी आक्षेपार्ह विधाने आम्ही कधीच खपवून घेणार नाही’, असं धंगेकर म्हणाले आहेत.

    Maharashtra TimesDhule News : आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

    स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा प्रयत्न

    ‘ लाडकी बहीण योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरू केली. या योजनेमुळे भाजपसह महायुतीचे सर्व आमदार निवडून आले. याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जाते, हे वारंवार आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वाचाळ भाजपच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे. राज्याच्या विकासासाठी, उद्योग वाढीसाठी सतत झटणारा नेता अशी उदय सामंत यांची जनमाणसात प्रतिमा आहे. त्यांनी कायमच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य दिलं आहे. अशा नेत्यांवर आक्षेपार्ह विधान करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा हा चौधरी आणि पटेल यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो आहे’, असही धंगेकर यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

    Maharashtra TimesPune Police: सिंघमगिरी पुणे पोलिसांच्या अंगलट! तीन आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवणाऱ्या PI ची बदली, पोलीस महासंचालकांना नोटीस

    भाजपला धमकीवजा इशारा

    दरम्यान, ‘भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वक्तव्याची दखल घेऊन, पक्षशिस्त न पाळणाऱ्या संबंधितांस योग्य तो जाब विचारावा. अन्यथा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारनामे पुराव्यांसकट दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणू’, असा थेट इशारा सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद किती टोकाला जातो याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा