Farmer Death Cases: पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्या आहेत. यावर्षी राज्य शासनाने २ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. ५ जुलै रोजी पहिली यादी येणार होती.
सततच्या नापिकीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकरी थकीत कर्जदार आहेत. कर्ज थकीत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांना चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन शेती करावी लागते. त्यातच यावर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
Love Story: स्नॅपचॅटवर प्रेम जुळलं; तरुणी प्रियकरासाठी थेट महाराष्ट्रात आली; नंतर नातेवाईकही पोलिसांसह धडकले, पण एका गोष्टीने डाव पलटला!
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी आपला सात-बारा कोरा होणार या आशेवर होते. यानंतर नवे कर्ज घेऊन खरीप हंगामाची तरतूद करू या विचारात शेतकरी होता. पण, अजूनही कर्जमाफीची यादी आली नाही. बँकांनी हात आखडता घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यात सरासरी पीककर्ज वाटपाचा टक्का ५०च्या आतच अडकला आहे. अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी हादरला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना जाहीर केल्या. पण, शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांतील शेतकरी आत्महत्यांचा आकड्यांनी परिस्थितीचे गांभीर्य वाढविले आहे. पूर्वी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा देशभर गाजत होता. त्याची दखल घेतली जात होती. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची दखल सत्तारूढसह विरोधी पक्षाचे नेतेही घेत नसल्याचे चित्र आहे. यातूनच या घटना वाढल्याचाही आरोप होत आहे.
Pune News : आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला
२७ कुटुंबांनाच मिळाली मदत
आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याने राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मागील सहा महिन्यांत झालेल्या १४४ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ २७ कुटुंबांना सरकारची मदत मिळाली आहे. अजूनही ११७ शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
बोलके आकडे…
एकूण शेतकरी आत्महत्या : ४१५
पात्र : १४४
अपात्र : ८८
चौकशी सुरू : १८३
अमरावती विभागातील स्थिती
(१ जानेवारी ते ३० जून २०२६दरम्यान)
जिल्हा –शेतकरी आत्महत्या –पात्र –अपात्र –चौकशी सुरू
यवतमाळ —१२८ —४० —३३ —५५
वाशीम —६२ —०८ —१६ —३८
बुलढाणा —६९ —३८ —१४ —१७
अमरावती —७६ —२३ —१४ —३९
अकोला —८० —३५ —११ —३४
