Pandharpur Warkari Accident : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ असताना ट्रकने दिलेल्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे : श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी
बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या; उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
तापाच्या गोळ्यांनी ग्लानी आल्याची माहिती
दरम्यान, ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ग्लानी आली, अशी माहिती मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली नांदेडची असून मयत महिला वारकरी सांगलीच्या रहिवाशी होत्या.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीच्या ट्रकला अपघात झाला. अपघातग्रस्तांमध्ये सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या आहेत
Tamil nadu CM C. Joseph Vijay यांनी 2 महिन्यात घडवला बदल, Thalapathy Vijay pattern ची देशात चर्चा
रोहित पवार यांचे ट्वीट
“दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले असून ते लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करुन पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती!” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
Eknath Khadse : शाहांचा फोन, दिल्लीला बोलावून म्हणाले ‘भाजप जॉईन करो’, खडसेंचा गौप्यस्फोट; महाजनांचं नाव घेत मोठे दावे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच जखमींची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली आहे. आता त्या गंभीर जखमी असलेल्या महिलांना भेटण्यासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात जाणार आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालक, वाहनाचा वेग आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा