IAS Officer Tukaram Mundhe News : सरकारी अधिकाऱ्यांसाठी सहसा न घडणारी एक घटना साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तुकाराम मुंढेंबाबत गावकऱ्यांनी नेमकं काय केलं आणि त्यामागचं कारण काय, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर सध्या एका बॅनरवर खिळते आहे. बॅनरवर मोठ्या अक्षरांत लिहिलंय ‘२५ बदल्या झाल्या… पण तुकाराम मुंढे बदलले नाहीत.’ खाली आणखी एक ओळ आहे, ‘आम्ही सदैव तुमच्या सोबत.’ एवढंच वाचलं तरी अनेकजण गाडीचा वेग कमी करून हा फलक पाहत आहेत. कराड तालुक्यातील शिवडे, मसूर फाटा येथील ग्रामस्थांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ हा फलक उभारला आहे. गेल्या काही दिवसांत दूध भेसळ प्रकरणात त्यांनी केलेल्या धडक कारवाईनंतर त्यांच्या कामाची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा अनोखा उपक्रम राबवला.
फलकावर नेमकं काय दिसतंय?
फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, अशोकस्तंभ आणि तिरंग्याची प्रतिमा आहे. मध्यभागी तुकाराम मुंढे यांचा फोटो असून, ‘प्रामाणिकपणा कायम राहिला, कर्तव्यनिष्ठा कायम राहिली, जनसेवेचे ध्येय कायम राहिले’ असा संदेशही ठळकपणे देण्यात आला आहे.
अनेक बदल्या पण नियमांशी तडजोड नाही
प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांना अनेक वेळा बदलीचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी नियमांशी तडजोड केली नाही, अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळेच शिवडे ग्रामस्थांनी हा फलक उभारून त्यांच्या कामाला सार्वजनिक पाठिंबा दिला आहे.
Crime News : फक्त वॉशरूम वापरायचंय, तरुणीने नकार दिला, तरी डिलिव्हरी बॉय घरात शिरला; पुढे धक्कादायक घडलं
नागरिकांच्या भावनांची चर्चा
महामार्गावर झळकलेला हा बॅनर आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांकडून त्याचे फोटो शेअर केले जात असून, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंबद्दल नागरिकांच्या भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या फलकावर कुठेही राजकीय घोषणाबाजी किंवा व्यक्तीपूजेचा अतिरेक दिसत नाही. जनहितासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सामान्य नागरिक उभे राहू शकतात, हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा फलक केवळ कराडपुरता मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, सोशल मीडियावरही त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा