• Sun. Jul 12th, 2026

    Vinayak Raut Case: विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रार प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक; कुटुंबाची डोकेदुखी वाढली!

    Vinayak Raut Case: विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रार प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक; कुटुंबाची डोकेदुखी वाढली!

    Crime News: माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

    विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या तक्रार प्रकरणात पोलिसांकडून पहिली अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने कुटुंबावर गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत कुटुंबाकडून माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करण्यात आला. तसंच माझे आर्थिक खच्चीकरण करून माझ्यावर अनेक अघोरी इलाज करत माझा अमानुष छळ केला आहे, असा आरोप सुनेने कुटुंबावर केला आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून सिंधुदुर्गतील दोन आणि रत्नागिरीतील एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सावंतवाडी-कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    “माझा पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही, हे माही असूनही विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. लग्नानंतर विविध कारणे देत तो शारीरिक संबंध टाळत होता. मी याबाबत विचारलं असता त्यांनी माझ्यासोबतच भोंदूबाबांकडून अघोरी कृत्य केलं. २०१८ ते २०२४ या काळात हे कृत्य घडलं आहे,” असं पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शनिवारी रात्री ठाणे पोलिसांकडून कारवाई करत फिरोज बाबा याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

    कोकणात राजकारण तापलं

    माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सुनेनेच गंभीर आरोप केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं असून राऊत कुटुंबावर टीका केली जात आहे. देवगड येथील भाजप महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक छळासह बुवाबाजीचा आरोप असल्याने पीडितेला संरक्षण देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, असं भाजपच्या महिला नेत्या तन्वी चांदोस्कर यांनी म्हटलं आहे. तर ‘स्वतःच्या घरातील महिलेलाच न्याय नाही, मग समाजाला काय न्याय देणार?’ असा सवाल प्रियांका साळस्कर यांनी केला आहे. राऊत यांच्या सुनेने केलेल्या आरोपानंतर भाजप महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली असून या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.

    काय आहे विनायक राऊतांचं म्हणणं?

    विनायक राऊत यांनी स्वत:सह कुटुंबावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले असून सुनेवरच गंभीर आरोप केले आहेत. “माझा मुलगा गितेश राऊत आणि त्याची पत्नी मागील तीन वर्षांपासून स्वतंत्र राहत आहेत. त्यामुळे आता त्यांची घटस्फोटाची केस सुरू असून सुनेने आधी १० कोटी रुपये मदत, २ कोटी रुपये मानसिक ताणाची रक्कम, एक ३ बीएचके फ्लॅट, आलिशान कार आणि महिन्याला ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली होती. पण या मागण्या मान्य न केल्याने तिने आमच्याविरोधात तक्रार दिली,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा