FDA Action Maharashtra : FDAने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत दूध, दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा साठा जप्त झाला, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आणि काही हॉटेल्सवरही कठोर कारवाई झाली. या संपूर्ण मोहिमेतील कारवाईचे आकडे आणि जिल्हानिहाय कारवाईची ए टू झेड माहिती जाणून घ्या.
९ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पाच ठिकाणी तपासणी करून २,२०९ किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा ७.९२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पान मसाल्याच्या विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ४१.०६ लाख रुपयांचा पान मसाल्याचा साठाही जप्त करण्यात आला.
याशिवाय मसाले, बेकरी पदार्थ आणि खाद्यतेलावरही कारवाई करण्यात आली. राज्यातील आठ आस्थापनांवर धाड टाकून १४.९२ लाख रुपयांचा सुमारे १२,८८५ किलो साठा जप्त करण्यात आला.
Tukaram Mundhe FDA Action : 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?
घाटकोपरमधील दुग्धालयाचा परवाना निलंबित
घाटकोपर पश्चिम येथील गौतम दुग्धालयात तपासणीदरम्यान १६० किलो बासुंदी, २१० लिटर कच्चे दूध आणि १६० किलो आईस्क्रीम असा एकूण ५३० किलो साठा जप्त करण्यात आला. लेबलिंग नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ साठवणूक आणि आवश्यक शीतसाखळी न पाळल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला.
अहमदनगर, लातूर, नवी मुंबईतही कारवाई
अहमदनगर जिल्ह्यातील दोन दूध उत्पादकांवर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे दूध जप्त करण्यात आले. लातूरमध्ये भेसळयुक्त दूध वाहतूक करणारे वाहन पकडून त्यातील संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. तर नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
हॉटेल्सवरही कारवाई
राज्यातील ५८ हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर पुणे, नाशिक आणि धुळे येथील मिळून चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
Maharashtra Rain Alert : पुढील 5 दिवस राज्यातलं हवामान कसं? पावसाची क्षणभर विश्रांती की धुमाकूळ? ‘या’ गोष्टीचा परिणाम दिसणार
अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवली जाईल, असा इशारा दिला आहे.
