• Fri. Jul 10th, 2026

    नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026
    नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर – महासंवाद

    • एमएनआरई–मेडा अंतर्गत सौर ऊर्जा उद्यानांच्या कामांना गती

    मुंबई, दि. १० : राज्यशासन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांची प्रभावी, पारदर्शक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व तत्परतेने कार्य करून हे प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिले.

    राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील एमएसआरडीसी कार्यालयात एमएनआरई व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) अंतर्गत राज्यात विकसित होत असलेल्या सौर ऊर्जा उद्यानांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    बैठकीस ऊर्जा विभागाचे अवर सचिव जयंत सागडे, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे संजय कुऱ्हाडे, पाटोदा सौर ऊर्जा प्रकल्पाचे यश धुमाळ, महावितरण, महापारेषण, मेडाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    बैठकीत पाटोदा सौर ऊर्जा उद्यानासह विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक मंजुरी, ग्रीड कनेक्टिव्हिटी तसेच मुदतवाढीच्या प्रस्तावांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यमंत्री साकोरे – बोर्डीकर यांनी दिल्या. प्रकल्पांच्या प्रगतीनुसार मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे त्वरित सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचेही निर्देशही त्यांनी दिली.

    प्रस्तावित सौर ऊर्जा उद्यानांच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची क्षमता असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या हरित ऊर्जावाढीस तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. प्रकल्पांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून आवश्यक प्रक्रिया गतिमान कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

    0000

    एकनाथ पोवार/विसंअ

     

     

    विधानपरिषद विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रतिनिधित्व देणारे प्रभावी व्यासपीठ – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
    मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा दिलासा; उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
    वाघोशी जलसिंचन प्रकल्पासाठी उर्वरित कामांना गती द्या; सुधारित प्रस्ताव सादर करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed