• Fri. Jul 10th, 2026

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६; नांदेड जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ६३५ कर्जदारांचा तपशील कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६; नांदेड जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ६३५ कर्जदारांचा तपशील कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड – महासंवाद

    नांदेड, दि. १० जुलै : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आतापर्यंत २ लाख ७ हजार ६३५ थकीत पात्र कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाइन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. सोनकाबंळे व जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली.

    शासनाने या योजनेअंतर्गत पात्र थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांचा डाटा संकलित करून तो शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी बँकांवर सोपविली होती. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, वाणिज्य, खाजगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी संबंधित पात्र कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पडताळणी करून ती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार तपासणी करून पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील एकूण २ लाख ७ हजार ६३५ थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. या पात्र शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची एकूण रक्कम २ हजार २२२ कोटी ३७ लाख रुपये इतकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढवून शेतीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed