• Fri. Jul 10th, 2026

    Tukaram Mundhe: मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; संभाजीनगरमधील धाडीत भेसळीची मोठी साखळी उघड!

    Tukaram Mundhe: मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; संभाजीनगरमधील धाडीत भेसळीची मोठी साखळी उघड!

    FDA Raid News: धाड टाकल्यानंतर भेसळीचं साहित्य आढळून आल्याने दोन कंपन्यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

    मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत;(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळखोरांवर धाडसत्र सुरू असून राजधानी मुंबईतही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात दूध भेसळीविरोधात धडक कारवाई करून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच दहिसर पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ४७० लीटर दूध नष्ट करण्यात आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दहिसरमध्ये नामांकित कंपनीच्या दूधाचे पाऊच फोडून भेसळ केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता अन्न व औषध प्रशासन व गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १२, दहिसर (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने धाड टाकण्यात आली. यावेळी लिंगय्या भिक्षमया गणता (वय ४२ वर्षे, खोली क्रमांक बी-३, दुबे चाळ क्रमांक २, राजेश कंपाउंड जवळ, दहिसर पूर्व, मुंबई) हा भेसळ करताना आढळून आला. सदर आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण ३ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

    संभाजीनगरमध्ये मोठं रॅकेट उद्ध्वस्त

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर कारवाई केली. ४९६ कि.ग्रॅ. Govardhan Whey Permeate Powder आणि Mlekpol Whey Permeate Powder च्या आधारे भेसळयुक्त दुध बनवून विकत असल्याचं समोर आलं आहे. भेसळयुक्त दूध व पावडर जप्त करून २ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तसंच टँकमध्ये साठवण्यात आलेलं ३,४९८ लिटर मिश्र दूध हे १ लाख ३२ हजार ९२४ रुपये किंमतीचं सदर Whey Permeate Powder चा वापर करून भेसळ करण्यात आल्याच्या संशयावरून नष्ट करण्यात आले. सिद्धेश्वर दूध डेअरीतील हे दूध तपासात शिवकृपा दूध डेअर इथं पुरवलं जात असल्याचं निष्पन्न झाल्याने त्या आस्थापन्यावरही धाड टाकून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान Schedule-४ मधील गंभीर त्रुटी तसेच Whey Permeate Powder चा वापर करून दूध भेसळ केल्याच्या संशयावरून दोन्ही आस्थापन्यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

    तपासात पुढं असंही निष्पन्न झालं आहे की, शिवकृपा दूध डेअरी येथून दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी तसेच पंचमहाल सहकारी दूध उत्पादन संघ,गोध्रा, गुजरात इथं पुरवलं जात होते. या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात दुधात भेसळ करणाऱ्या राजेंद्र जाधव (संकलन केंद्र मालक), योगेश लहाने (हजर व्यक्ती), तसंच शिवकृपा दूध डेअर, फुलंब्री यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलमे ३(५), ६१, १११, १२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६, २७, 3(9)(zz)(iv) व ५९ अन्वये फुलंब्री पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल क्र. ०३५५/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा