Sanjay Raut On Sharad Pawar-Eknath Shinde Visit: शरद पवार यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शरद पवार आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले.
‘ज्या एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली अशांच्या कार्यालयात जाऊन पक्षाच्या बैठका घेणे योग्य नाही. अख्खे विधानभवन ओस पडले होते का? समोर राष्ट्रवादी भवन आहे. समोर वाय. बी. प्रतिष्ठानही आहे. हे आमचे एका निष्ठावंत कार्यकत्याचे मत आहे.
Raj Thackeray : आता कुठे गेली ती बाई? आरजे मलिष्काबद्दल राज ठाकरे यांचा सवाल
आम्ही कधीही गद्दारांच्या ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याएवढे सहिष्णू नाही. आमचे मन एवढे मोठे नाही. आम्ही तेवढे मोठे करणारही नाही. ज्यांचे आहे त्यांनी ते करावे. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे’, असे राऊत म्हणाले. ‘यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही असतो तर आम्ही अजित पवार यांच्या दालनात आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. त्यांनी शरद पवार यांच्याशी बेइमानी केली हे आम्ही लक्षात ठेवले असते. महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे’, असेही राऊत म्हणाले.
‘बेकायदा दारूविरोधात अधिक तीव्र कारवाई’
‘राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करून महसूलवाढीसह बेकायदा दारूची वाहतूक आणि बनावट मद्यविक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे’, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ‘राज्याच्या महसूलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून, विभागाच्या महसुलात सुमारे १७.६३ टक्के वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी १०८८ नव्याने मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे’, असे ते म्हणाले.
Maharashtra Rain : ‘महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडणार’, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
यांच्यासाठी ‘आपला दवाखाना’ आहे
या टीकेवर शिवसेनेतून पलटवार केला जात आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनीदेखील राऊत यांना उत्तर दिले. ‘शरद पवारसाहेब राज्याचे मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता, यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत, तेथे त्यांनी जावे आणि उपचार करून घ्यावे’, असा पलटवार शिंदे यांनी केला.
‘राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही’
‘राऊत बोलतात त्याला फार महत्त्व देऊ नका, राजकारणात कोणी कोणाचे शत्रू नसते, उद्या उद्धव ठाकरे आले तरी आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करू, राजकारणात काहीही होऊ शकते’, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ‘आत्ताच एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीला सुनील तटकरे आणि जयंत पाटील बसले होते. शिवसेनेशी तुमची जवळीक आहे. तुमच्यासाठी आम्ही आमच्याकडे जागा करू शकतो, असे तटकरे गेल्यानंतर मी जयंत पाटील यांना म्हटले. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते’, असे सूचक वक्तव्यही सरनाईक यांनी केले.
