• Wed. Jul 8th, 2026

    नैसर्गिक आपत्तीग्रस्त सुमारे ८.८४ लाख शेतकऱ्यांना ₹७१३.९६ कोटींची मदत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 8, 2026
    नैसर्गिक आपत्तीग्रस्त सुमारे ८.८४ लाख शेतकऱ्यांना ₹७१३.९६ कोटींची मदत – महासंवाद

    नागपूर, दि. ८ : नैसर्गिक आपत्तींमुळे अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसेच अवकाळी पावसामुळे शेतपीक व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या नागपूर विभागातील ८ लाख ८३ हजार ९६५ शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यात एकूण ७१३ कोटी ९५ लाख ७२ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे,

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सन २०२५-२६ मध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हानिहाय निधीचे वाटप करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांनी दिल्ली . नैसर्गिक आपत्तींमुळे अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ आदी कारणांमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनामार्फत मदत देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. या अंतर्गत शेतपिकांचे नुकसान, शेतजमिनीचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू तसेच जीवितहानीबाबत मदत व सहानुग्रह अनुदान राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत वितरित करण्यात येते.

    नागपूर विभागात 2025- 2026 या वर्षात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातील ९ लाख ९५ हजार ५२३ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी एकूण ७९६ कोटी ७१ लाख ५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ८ लाख ८३ हजार ९६५ प्रकरणांमध्ये ७१३ कोटी ९५ लाख ७२ हजार रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे.

    जिल्हानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे

    नागपूर जिल्ह्यात १ लाख ३१ हजार २६७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ लाख १५ हजार २८७ प्रकरणांमध्ये १२४ कोटी ५८ लाख ५६ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

    वर्धा जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २ लाख ३५ हजार ४२७ प्रकरणांमध्ये २२४ कोटी ८३ लाख १४ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.भंडारा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ५७१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ लाख २६ हजार ९१० प्रकरणांमध्ये ८४ कोटी १२ लाख २४ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

    गोंदिया जिल्ह्यात १ लाख ४८ हजार ८८२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ लाख ३७ हजार १८७ प्रकरणांमध्ये ८८ कोटी ५२ लाख ११ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख २० हजार ६६८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ लाख ९० हजार ७५० प्रकरणांमध्ये १३३ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात ९८ हजार ६१५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ७८ हजार ४०४ प्रकरणांमध्ये ५८ कोटी १५ लाख ५४ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.

    निधी वितरणाची प्रक्रिया संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत प्राधान्याने सुरू असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजया लक्ष्मीबिदरी यांनी दिले.

                                                

                                         00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed