म. टा. प्रतिनिधी, पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे नऊ जुलैला शहरात आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील; तसेच मुक्कामस्थळांजवळील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी, यासाठी नऊ ते ११ जुलैदरम्यान विशेष वाहतूक आराखडा लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पालखी मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध असतील.
दरम्यान, कात्रज, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, येरवडा, हडपसर आणि वानवडी परिसरातून येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रमुख रस्ते बंद
नऊ जुलैला पहाटेपासून रात्रीपर्यंत बोपखेल फाटा-विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, गणेशखिंड रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक, नाना पेठ, भवानी पेठ; तसेच पालखी मार्गावरील विविध रस्ते वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने बंद राहतील.
मुक्कामस्थळी निर्बंध
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. त्यामुळे या भागात नऊ जुलैच्या दुपारपासून ११ जुलैपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी राहील. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि काही प्रमुख रस्त्यांवर निर्बंध असतील.
दरम्यान, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व तयारी आणि नियोजनाची पाहणी केली आहे. आज, आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल. गुरुवारी (नऊ जुलै) पालखी पहाटे पाच वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. तर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, बुधवारी (आठ जुलै) श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. परंपरेनुसार माउलींची पालखी संजीवन समाधी मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहे. यानिमित्त मुख्य मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुख्य सोहळा दुपारनंतर प्रारंभ होईल. पावसामुळे इंद्रायणीला पूर आला असून, चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मर्यादित दिंडेकरी, वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रस्थान कार्यक्रम आयोजित केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा