• Mon. Aug 24th, 2026

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 6, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना – महासंवाद


मुंबई, दि.६ :  मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. सदर दरडचा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.

रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड – म्हाप्रळ गोरेगाव – माणगाव वाहतूक बंद केली आहे. सदर जागी पोलीस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांचेवतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ फसलेले 12 कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
0000

Bhuleshwarcha Raja : भुलेश्वर दुर्घटनेनंतर 22 वर्षांपूर्वीच्या निर्णयाची पुन्हा चर्चा, मुंबईत बाप्पाच्या आगमनावेळी नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनीही जेन झींची गर्दी जमवत ताकद दाखवली; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर हल्लाबोल, काँग्रेसवर आरोप करताना काय म्हणाले?
Mumbai News : ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटना प्रकरणात नवीन माहिती समोर, कशामुळे बाप्पाची मूर्ती कोसळली? पोलिसांच्या तपासात खरं कारण समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed