• Sun. Jul 5th, 2026

    मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी जाहीर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 5, 2026
    मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी जाहीर – महासंवाद

    मुंबई, दि. ५ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.

    या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.

    आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे,  असे देखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed